spare parts of vehicles are sold from police stations  
नागपूर

अजब कारभार! जप्तीचे साहित्य जाते तरी कुठे? पोलिस ठाण्यातून वाहनांचे सुटे भाग बेपत्ता

विजय राऊत

हिंगणा(जि. नागपूर) : नागपूर शहर पोलिस आयुक्तालयातंर्गत येणाऱ्या हिंगणा, बुटीबोरी एमआयडीसी व हिंगणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात कारवाईत जप्त झालेल्या वाहनांचा लिलाव न करताच परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याची चर्चा सुरू आहे. जप्तीच्या वाहनांचे सुटे भागही बेपत्ता होत असल्याची ओरड सुरू आहे. यामुळे शासनाला मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

हिंगणा एमआयडीसी, बुटीबोरी एमआयडीसी, मिहान हा औद्योगिक परिसर आहे. यामुळे परप्रांतीय लोकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य या परिसरात आहे. चारचाकी व दुचाकी वाहने चोरी होण्याच्या घटना या परिसरात नेहमीच घडत असतात. पोलिस कारवाईत काही वाहने जप्त केली जातात. या वाहनांचे मालक कधीच भटकत नसल्याने ही वाहने वर्षोगणती पोलिस ठाण्यात पडून राहतात. 

दरम्यान जप्तीच्या वाहनातील सुटे भागही काही दिवसांनी बेपत्ता होतात. चार चाकी वाहनाचेही महागडे सुटे भाग चोरीला जात आहे. या व्यतिरिक्त कारवाईतील जप्तीच्या लोखंडी साहित्याचीही परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. शेकडो वाहने तीनही पोलिस ठाण्यात अनेक वर्षांपासून पडून आहेत. यातील काही वाहने भंगारवस्थेत आहेत. पोलिस कारवाईत जप्त झालेली वाहने व इतर साहित्याचा लिलाव होणे गरजेचे आहे.

अशी दिली जाते लिलावाला बगल

लिलाव करण्यासाठी लांबलचक प्रक्रिया पोलिसांना पार पाडावी लागते. यामुळे या प्रक्रियेच्या भानगडीत न पडताच काही वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहरर व रोखपाल यांना हाताशी धरून जप्तीच्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून सरकारला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याने १९९१ साली ९१ जप्तीच्या वाहनांचा लिलाव केला होता. यातून २ लाख २१ हजारचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला होता. 

हिंगणा व बुटीबोरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अद्याप जप्तीच्या साहित्याची लिलाव प्रक्रियाच पार पडली नाही. मग हे जप्तीचे साहित्य नेमके जाते कुठे, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपायुक्तांनी करावी, यानंतरच जप्तीच्या साहित्याचे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. यामुळे शासनाचा उडणारा लाखो रुपयांचा महसूल बुडणार नाही, एवढे मात्र खरे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT