नागपूर

प्रेरणादायी स्टार्टअप! दीड लाखाच्या गुंतवणुकीत पाच कोटींची उलाढाल

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश तरुण उदरनिर्वाहासाठी खासगी किंवा सरकारी नोकरीला प्राधान्य देतात. मात्र, आकाश काटोलेला नोकरी करायची नव्हती. पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीने देऊ केलेले लाखोंच्या पॅकेज धुडकावून लावत स्वतःचा व्यवसाय थाटला. केवळ दीड लाखाची गुंतवणूक करून सुरू केलेल्या व्यवसायाची भरभराट होऊन अवघ्या तीन वर्षांत उलाढाल पाच कोटींवर नेली. स्टार्टअपच्या माध्यमातून आकाशने अल्पावधीत साधलेली प्रगती नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांसाठी नवी दिशा देणारी आहे. (Startup-News-Start-Business-Tours-and-travels-nad86)

महाल परिसरात राहणारा ३० वर्षीय आकाश स्टार्टअपबद्दल म्हणाला, साधारण तीन-चार वर्षांपूर्वी एमबीए केले. त्यानंतर लगेच पुण्यातील मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला. कंपनीने साडेतीन लाखांचे पॅकेज देत नियुक्तीचे पत्र पाठविले. मात्र, पुण्यासारख्या मोठ्या शहरात जॉब करणे पटले नाही आणि नकार कळवत नागपुरातच राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काही महिने संगणक शिक्षक व दुरुस्तीची कामे केल्यानंतर मित्राच्या मदतीने भविष्यातील योजनांवर विचारमंथन सुरू केले.

मित्रांसोबत नवनव्या आयडियाजवर चर्चा करीत असताना एकेदिवशी ‘बियॉंड डेस्टिनेशन’ची कल्पना पुढे आली. ‘बियॉंड डेस्टिनेशन’च्या माध्यमातून हॉटेल व विमानाचे तिकीट बुकिंग करण्यापासून डोमेस्टिक व इंटरनॅशनल टूर, हनिमून पॅकेज, कॉर्पोरेट टूर्स, क्रूझ, व्हिसा आदी कामे केली जातात. ऑफिसमध्ये माझी छोटीशी टीम आहे. त्यांच्या मदतीने व्यवसायाचा गाडा सुरू आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये सक्रिय असल्याने तेव्हाचा दांडगा संपर्क या व्यवसायात खूप कामी आला.

काही वर्षांपासून देशविदेशांत फिरण्याचे फॅड वाढल्याने पर्यटन क्षेत्राला चांगलाच बूम आला असून, ट्रॅव्हल एजन्सीचीही चांगली कमाई होत आहे. कोरोनामुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची स्थिती असली तरी व्यवसायावर फारसा फरक पडला नाही. कोरोनाच्या काळातही अपवाद वगळता ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या मालदीव आणि दुबई ‘हॉट डेस्टिनेशन’ असून, देशात सिमला, मनाली, काश्मीर व गोव्याला लोक अधिक पसंती देत आहेत.

‘स्टार्टअप’चा तरुणांना सल्ला

केंद्र व राज्य सरकारला प्रत्येकाला सरकारी नोकऱ्या देणे शक्य नाही. ती अपेक्षाही करणे चुकीचे आहे. त्यामुळे आत्मनिर्भर होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उच्चशिक्षित तरुणांना वारंवार स्वतःचा व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करण्याचा सल्ला दिलेला दिला. अनेकांनी त्यांचा सल्ला मनावर घेत स्टार्टअप सुरू करून स्वतःसह इतरांचीची प्रगती साधली आहे. अनेक नावीन्यपूर्ण स्टार्टअपमुळे मोदींच्या स्टार्टअप मोहिमेला मोठा हातभार लागत आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतरांप्रमाणे नोकरी करायची नव्हती. आयुष्यात वेगळे काही करायचे होते. म्हणूनच मार्केटमधील ट्रेंड बघून ‘बियॉड डेस्टिनेशन’ची स्थापना केली. तीन वर्षांमध्ये ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, भविष्यात आणखी नवनवीन संधी शोधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
- आकाश काटोले, संस्थापक, ‘बियाँड डेस्टिनेशन’

(Startup-News-Start-Business-Tours-and-travels-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ ४०० धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

Baba Vanga Prediction : निम्मा जून उलटूनही पाऊस नाही! 2026 बद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतीये का? नेमकं काय म्हटले होते?

Latest Marathi News Live Update : तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने चित्रपट अभिनेते विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश, तसेच क्रिकेटपटू तिलक वर्मा, अंबाती रायडू आणि मोहम्मद सिराज यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या

Panchwati Crime : सूटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून खून केल्याची माहिती

SCROLL FOR NEXT