नागपूर

'सांगा आम्ही पेपर द्यायचा कसा?; विद्यार्थ्यांचा सवाल

मंगेश गोमासे

नागपूर : कोरोनामुळे एका वर्षापासून महाविद्यालयांचे शिक्षण ऑनलाइन (Online education) पद्धतीने सुरू आहे. मात्र, त्यातून बऱ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांना उमगत नसल्याचे दिसून येते. याशिवाय यावर्षी प्रवेश लांबल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळताच परीक्षांना सामोरे जावे लागले. यामुळे केवळ बाजारात मिळणाऱ्या छापील नोट्सवर विद्यार्थ्यांची मदार आहे. मात्र, टाळेबंदीमुळे (Lockdown) दुकाने बंद आहेत. त्यामुळे नोट्स मिळत नसल्याने महाविद्यालय स्तरावर सुरू असलेल्या परीक्षा (RTMNU Exams) द्याव्या कशा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. (Students are struggling to give papers due to problems in Nagpur)

विद्यापीठाद्वारे ५ ते ३१ मेदरम्यान एम.ए., एमएस्सी, एम.कॉम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांचे प्रवेश विद्यापीठाद्वारे केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार घेण्यात आल्याने जवळपास एप्रिलपर्यंत प्रवेश सुरू होते. मात्र, त्याचे सत्र जानेवारीपासून सुरू झाले. यादरम्यान जवळपास सर्वच शिक्षकांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मात्र, सर्व वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ते डोक्यावरून जात असल्याचे दिसून आले.

त्यामुळे छापील नोट्सवर विद्यार्थी अवलंबून असतात. मात्र, गेल्या महिन्याभरापासून राज्यात टाळेबंदी असल्याने बूकस्टॉल्स आणि इतर दुकाने बंद आहेत. विशेष म्हणजे, महाल येथील राजविलास टॉकीज परिसरात जुन्या पुस्तकांची दुकाने आहेत. या दुकानांच्या माध्यमातून विद्यार्थी जुने नोट्स आणि पुस्तके खरेदी करतात. मात्र, तीही दुकाने बंद असल्याने विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय वरच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांचेही नोट्स मिळत नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.

पंधरा दिवसांपासून नोट्ससाठी चकरा मारत आहे. मात्र, त्या मिळालेल्या नाहीत. दोन दिवसांवर परीक्षा आली आहे. मात्र, नोट्स नसल्याने परीक्षा कशी द्यावी, असा प्रश्न आहे.
-आशिष बांते, एम.ए. प्रथम सत्र

(Students are struggling to give papers due to problems in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT