file 
नागपूर

हत्या केल्यानंतर "त्याने' केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण; पण पत्नी आढळली जिवंत, पुढे काय झाले...

संदीप भुयार

कळमेश्वर (जि.नागपूर) :  अनैतिक संबंधाच्या संशयातून मी माझ्या पत्नीची हत्या केली जी साहेब! तिच्या डोक्‍यावर दगड मारला. मला आत्मसमर्पण करायचं आहे, अशी बतावणी आरोपीने पोलिसांकडे केली. आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. तर ज्या पत्नीच्या हत्येसाठी आरोपीने आत्मसमर्पण केले ती जिवंतच आढळल्याची खळबळजनक घटना तेलगाव येथे घडली.

ती फोनवर कुणाशी बोलते?
हरिप्रसाद रामकरण भलावी (35, बेसदेही, जि. बैतुल, मध्य प्रदेश) असे आरोपी पतीचे तर निशा मुन्शी यादव (26) असे पत्नीचे नाव आहे. दोघेही गत काही महिन्यांपासून तालुक्‍यातील तेलगाव येथील नाना खुसपरे यांच्या घरी किरायाने राहतात. मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतात. निशाचा हरिप्रसाद सोबतचा हा दुसरा विवाह आहे. गत काही दिवसांपासून निशा कुठल्यातरी व्यक्तीशी मोबाईलवर बोलायची. त्यामुळे पती हरिप्रसादला तिच्यावर संशय येऊ लागला. या संशयातून दोघांमध्ये नेहमीच भांडणे व्हायची. या भांडणाला हरिप्रसाद कंटाळाला होता. घटनेच्या दिवशी 24 एप्रिलच्या रात्री निशा पुन्हा फोनवर बोलताना आढळली. त्यामुळे दाम्पत्यामध्ये भांडण झाले. या भांडणात हरिप्रसादने निशाचा "गेम' करण्याचा निश्‍चय केला अन्‌ मध्यरात्री तीनच्या सुमारास निशा गाढ झोपेत असताना तिच्या डोक्‍यावर मोठा दगड मारला. अचानक झालेल्या जोरदार प्रहारामुळे निशा बेशुद्ध झाली. भीतीमुळे हरिप्रसादला निशाचा मृत्यू झाला असल्याचे वाटले. त्यामुळे आता पोलिस येणार आणि आपल्याला पकडणार, त्यापेक्षा आपणच पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण करण्याचा त्याने निश्‍चय केला अन्‌ सावनेर पोलिस ठाणे गाठले.

पोलिसही झाले अवाक...
साहेब, मी माझ्या पत्नीला मारले हो, असे त्याने सावनेर पोलिसांना सांगितले. परंतु, तेलगाव हे कळमेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत येत असल्याने सावनेरचे ठाणेदार अशोक कोळी यांनी ही माहिती कळमेश्वरचे ठाणेदार मारुती मुळूक यांना दिली. घटना मोठी असल्याने मुळूक यांनी पोलिस उपनिरीक्षक मनोज खडसे, लक्ष्मण रुडे, राजकुमार राऊत, तभाणे, गणेश युधमाळी, मन्नान नौरंगाबादे यांच्यासोबत घेऊन घटनास्थळ गाठले. तपासणी केली असता, पोलिस आश्‍चर्यचकित झाले. कारण ज्या आरोपीने पत्नीच्या हत्येसाठी आत्मसमर्पण केले, ती पोलिसांना जिवंतच आढळून आली. परंतु, तिच्या डोक्‍याला जबर मार लागल्याचे पोलिसांना दिसून आले. तिला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुटून आल्यावर मुलांसह संपविण्याची धमकी
या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी आरोपी हरिप्रसाद रामकरण भलावी याच्याविरोधात गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. आरोपीला जाब विचारण्यासाठी निशाच्या वडिलांनी फोनवरून विचारणा केली असता, आरोपीने आता मी जातो आहे; पण सुटून आल्यावर तिच्यासह मुलांना संपविण्याची धमकी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT