talkies doorkeeper struggling life
talkies doorkeeper struggling life  
नागपूर

सिनेमागृहातील डोअरकीपर म्हणतात, नव्या जमान्याने जुना जमाना केला उद्‌ध्वस्त

केवल जीवनतारे

नागपूर : "जुने... ते सोने' अशी एक म्हण आहे साहेब, ती आमच्यासाठी लागू पडते. त्या काळात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, ऋषी कपूरपासून तर शाहरुख खान यांच्या सिनेमांना होणाऱ्या गर्दीचा काळ आमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. शहरात मल्टिप्लेक्‍स तयार झाले. मोबाईवर सिनेमा दिसू लागला, आणि आमच्यावर संकट ओढवले. जुन्या थाटणीच्या सिनेमागृहाकडे प्रेक्षकांनी तशीही पाठ फिरवली आहे. त्यातच कोरोनाचं महासंकट आलं. नव्या जमान्याने आमचा जुना जमाना उद्‌ध्वस्त केला. ही व्यथा सांगत होते सिनेमागृहाच्या प्रवेशद्वारावरील डोअरकीपर.

सिनेमा बघण्यासाठी चित्रपटगृहात जाण्याआधी "डोअरकीपर' नावानं ओळखली जाणारी ही माणसं दारातच तिकीट मागतात. सिनेमाचं तिकीट आहे की नाही, ते बघण्याचं, तपासण्याचं त्यांचं काम. चित्रपटगृहात कितीही झुंबड असली तरी एका-एका प्रेक्षकाचं तिकीट बघून सिनेमा हॉलमध्ये सोडण्याचे काम डोळ्यात तेल टाकून करतात. डोअरकीपर मंडळींचे कर्म ते वर्षानुवर्षे निभावत आहेत. मात्र, दोन महिन्यांपासून देशातील चित्रपटगृहांना टाळे लागले आहेत. घरातून बाहेर पडणं होत नाही. त्यांच्या पोटातील आग एखाद्या चित्रपटातील दृश्‍याप्रमाणे नजरेत टिपण्याची संधी मिळाली. नागपुरातील "संजय' एका जुन्या काळातील चित्रपटगृहात मागील पन्नापेक्षाही अधिक वर्षांपासून डोअरकीपर बनून त्यांनी आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला.

मुलांना शिकवलं. पंख फुटल्यानंतर मात्र ते एखाद्या पक्ष्याप्रमाणे भुर्रर्र उडून गेले. आज सत्तरीत ते विपन्नावस्थेत जगत आहेत. "शोले' चित्रपट नागपुरात अनेक चित्रपटगृहात लागला असूनही या चित्रपटाचे वर्षानुवर्षे सलग "शो'ज सुरू होते. तिकीट ब्लॅक करण्याचे अनेक विक्रम शोले चित्रपटाने मोडून काढले होते. राजेश खन्ना यांचा रोटी, सौतन पासून तर अमिताभ बच्चनचे जंजीर, दिवार, काला पत्थर, ऋषी कपूरचा कर्ज, सरगम तर जितेंद्रचा हिम्मतवाला, मवालीपासून तर शाहरुख खान यांच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, संजय दत्त याचा सडक, साजन, मुन्नाभाई असे अशा चित्रपटांमुळे आमच्या आमदानीत बऱ्यापैकी भर पडत होती. परंतु, आता असे रेकॉर्ड बनवणारे चित्रपट तयारच होत नाही. अलीकडे कोट्यवधींचा व्यवसाय चित्रपटातून होतो, परंतु डोअरकिपरच्या हातात एक रुपयाही अतिरिक्त पडत नाही. राज्यात डोअरकिपरची संख्या चार हजारांच्या घरात असल्याची माहिती एका चित्रपट कर्मचारी संघटनेतर्फे मिळाली आहे. कोरोनाच्या महामारीत कलावंतांसारखे यांना मासिक मानधन द्यावे अशी मागणी पुढे येत आहे.

यांच्या वेदनांना नाही किंमत

मराठी वाङ्‌मय विषयात त्यांनी "एमए'ची परीक्षा पास केली. अंशकालीन कर्मचारी म्हणूनही काम केले, परंतु जगणे स्थिरावले नाही. 1970 च्या दशकात "मेरा नाम जोकर' चित्रपट बघण्यासाठी आल्यानंतर टॉकीजमधील मॅनेजरला कामासंदर्भात विचारले. "डोअरकीपर'चे काम असल्याचे सांगितले आणि यामुळे पोटातील भूक भागविण्यासाठी टॉकजच्या डोअरवर कीपर म्हणून तो उभा, तो आजतागायत आहे. खेळ संपल्यावर एखादी खुर्ची तुटलेली आढळली तर व्यवस्थापकांना कळवावं लागतं. तिकीट खिडकी सांभाळणाऱ्यांना "तिथलं तिकीट देऊ नका', हे सांगावं लागतं. आयुष्यभर कंत्राटी कामगार म्हणूनच जगत आल्याचे ते सांगतात. या कामातून पैसा फारसा मिळत नाही. शिल्लक काहीच राहत नाही. उधारी उसनवारीवरच जिंदगी सुरू झाली. झगमगत्या सिनेमांच्या कोटी-कोटी व्यवसायांच्या या स्वप्नांच्या दुनियेत डोअरकीपर यांच्या वेदनांना किमत नाही. एकच चित्रपट शेकडो वेळा बघण्यापलीकडे दुसरा आनंद यांना अनुभवता येत नाही.

एक अनुभव....

मुलगा म्हणाला, बाबा....तुम्ही डोअरकीपर झाल्यामुळे अनेक चित्रपट फुकट पाहता आले. मी पण डोअरकीपर होईल...हा लेकराचा संवाद ऐकला आणि त्याचवेळी त्याचवेळी त्याच्या कानशिलात थप्पड दिली. लेकराला शिकवले. तो सायेब झाला खरा, परंतु त्याने आपल्या आयुष्याचं इंजिन मुंबईत हलवलं ते कायमचं, हा अनुभव सांगताना संजयच्या डोळ्यात पाणी आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT