file 
नागपूर

ग्रामीण ब्रेकिंग : नागपूर जिल्हयातील "हा' तालुका आहे सर्वात मोठा "हॉटस्पाट', रूग्णसंख्या 75पेक्षा अधिक...

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर ): सर्वदृष्टीने गेल्या महिन्यापर्यंत सुरक्षित असलेला जिल्हा आता कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. कामठी, कन्हान, काटोल, कोंढाळी आदी शहरांनतर आता हिंगणा तालुका संसर्गग्रस्त म्हणून कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. गुरूवारपर्यंत रूग्णसंख्या 75 इतकी आहे. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

आणखी वाचा : आरटीई प्रवेश : चुकीची कागदपत्रे देत असाल तर खबरदार

नीलडोहचे अमरनगर सर्वाधिक प्रभावित
वानाडोंगरीतील महाजनवाडी येथे आज दोन व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह मिळाले आहेत. तालुक्‍यातील कोरोनाबाधीतांची संख्या सध्या 75 झाली आहे. सतत वाढणा-या रुग्णसंख्येने जनतेत दहशत पसरली आहे. वानाडोंगरीतील साईराम चौकातील रुग्णांशी व अमरनगर येथील कोरोनाबाधित रुग्णांशी या रुग्णांचे "कनेक्‍शन' आहे. सुरुवातीला कोरोनाबधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.सर्वाधिक कोरोनाबाधीतांचे प्रमाण सध्या ग्रामपंचायत निलडोह अंतर्गतच्या अमरनगरातील आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांनी सांगितल्यानुसार एकूण 75 कोरोनाबाधीतांपैकी एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 11 व्यक्ती उपचारानंतर आपल्या घरी परतले.
हेही वाचा : पारशिवनीत नळातून येते पिवळे पाणी, कोण खेळत आहे नागरिकांच्या जिवाशी

तालुका लॉकडाउनमध्ये
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे तालुक्‍यातील प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन विनाविलंब लावण्यात यावा, अशी मागणी आमदार समीर मेघे यांनी केली आहे. तालुक्‍यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता तालुक्‍यातील एमआयडीसी परिसरसह सर्वच भागातील जीवनावश्‍यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आजपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा आदेश हिंगणा पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे यांनी काढला असून सर्व ग्रामपंचायतीला याबाबत सूचना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT