Team came from pune to audit corona numbers in nagpur  
नागपूर

कोरोनामुळे अचानक वाढलेल्या मृत्यूंमागचं रहस्य उलगडणार? डेथ ऑडिटसाठी पुण्यातून पथक नागपुरात

राजेश प्रायकर

नागपूर : कोरोनाबळींची संख्या हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली असून यातील सर्वाधिक ७० ते ८० टक्के मृत्यू गेल्या दीड महिन्यांतील आहेत. मागील दीड महिन्यांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमागील रहस्य काय? याबाबत तपासणी करण्यासाठी पुण्यातील दोन सदस्यांचे पथक शुक्रवारी उपराजधानीत दाखल झाले.

कोरोना विषाणूच्या मिठीत अडकून दगावणाऱ्यांची संख्याही भयावह स्थितीत वाढली आहे. आजही ४२ मृत्यूची नोंद झाली असून कोरोनाबळींची संख्या ९४६ पर्यंत पोहोचली. सातत्याने वाढत्या मृत्यूने चिंतेत भर घातली. मात्र, दीड महिन्यांमध्ये नोंदविल्या गेलेल्या एकूण कोरोना बाधितांच्या मृत्यूंपैकी ८० टक्के बाधित हे सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. 

त्यामुळे कोरोनाची बाधा झाल्यानंतर भारतीय वैद्यकीय चिकित्सा परिषदेने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांच्यावर उपचार झाले काय? की या मृत्यूमागे आणखी काही कारणे दडली आहेत, याबाबतचा शोध हे पथक घेणार आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सूचनांनुसार या दोन सदस्यीय पथकात डॉ. सांगोळे आणि डॉ. नाईक यांचा समावेश आहे. या दोघांपैकी डॉ. सांगोळे हे कोणालीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी मेडिकलमध्ये तर डॉ. नाईक मेयोत दाखल झाले. या दोघांनीही गेल्या दीड महिन्यांत कोरोनाची बाधा होऊन उपचारादरम्यान दगावलेल्यांच्या उपचारासंबंधी कागदपत्र तपासल्याची माहिती सूत्राने दिली.

अचानक दाखल झालेल्या पथकामुळे मेडिकल, मेयो प्रशासनाला धक्का बसला आहे. या पथकासंदर्भात गुप्तता पाळण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी दिल्या असून चार दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे तूर्तास तरी यावर मला बोलता येणार नाही, असे सांगत डॉ. सांगोळे यांनी उत्तराला बगल दिली. या पथकाची अचानक भेट कशासाठी? कोरोना मृत्यूशी निगडीत सरकार काही लपवीत तर नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित यानिमित्त उपस्थित झाले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT