team of experts will come from Mumbai to stop corona in Nagpur : Anil Deshmukh 
नागपूर

नागपुरात कोरोना आटोक्याबाहेर; या शहरातील चमू मिळविणार नियंत्रण, उद्या होणार दाखल  

अतुल मेहेरे

नागपूर : नागपुरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या ४८ तासांत तीन हजारांवर लोकांना कोरोनाची बाधा झाली, तर ८७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जनतेसह प्रशासनसुद्धा हादरले आहे. हा प्रकोप रोखण्यासाठी नागपुरात उद्या तज्ज्ञांची चमू येणार आहे. दुपारी १२.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात ही चमू येथील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ज्या पद्धतीने मुंबईतील धारावी व कोळीवाडासह इतर भागांतील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी उपाययोजना केल्या, त्या तज्ज्ञांचा या चमूमध्ये समावेश राहणार आहे. यात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचासह फफ्फुस तज्ज्ञ डॉ. हेमल शहा, गंभीर रोग विशेषज्ञ डॉ. राहुल पंडित, जनरल सर्जन डॉ. मुफझल लकडावाला, कान, नाक, घसा विशेषज्ज्ञ डॉ. गौरव चतुर्वेदी यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. 

पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा व धारावीसह मुंबईच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह निघत होते. परंतु, आता येथील परिस्थिती अगदी सामान्य झाली आहे. त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षाही जास्त आता नागपूर शहरात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईचे स्थानिक प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे काम करीत आहे.

ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्रयत्न केले त्याच धर्तीवर त्यांचा अनुभव घेऊन नागपुरात काय उपाय योजना कराव्या लागतील, याची चर्चा या बैठकीत होणार आहे. डॉ. हेमल शहा, डॉ राहुल पंडित, डॉ. मुफझल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांनी ज्या पद्धतीने मुंबई येथे कोरोनाची परिस्थिती हाताळली, त्याच पद्धतीने नागपूर येथील परिस्थिती कशी हाताळायची यावर ते मार्गदर्शन करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी कळवले आहे. 

नागपुरात कोरोना विषाणूने मृत्यूचे तांडव घातले आहे. दररोज मृत्यूंच्या आकड्यांचा नवा विक्रम तयार होत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तीन हजार १५० नवीन बाधितांची भर पडली. तर ८७ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यामुळे नागपुरात कोरोनाच्या मृतांचा आकडा ११३२ वर पोचला आहे. तर बाधितांची संख्या ३२ हजार ७०५ वर पोचली आहे. यामुळे नागपूरचे जिल्हा प्रशासन हादरले आहे. ही चिंताजनक परिस्थिती बदलण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पूणे मुंबईतून पथक येत आहेत. मात्र तरीदेखील कोरोना आटोक्यात येत नाही. नागपुरात बुधवारी निवृत्त उपजिल्हाधिकारी यांचाही कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे पुढे आले.

दोन दिवसांमध्ये नागपुरात ३ हजारावर कोरोनाबाधित आढळून आले असून बुधवारी (ता.२) एकाच दिवशी १७०३ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर ४१ जण दगावले आहेत. मंगळवारी देखील ४६ जणांचा मृत्यू झाला असून १२२७ जण बाधित आढळले होते. दोन दिवसांत मेडिकलमध्ये ३४ तर मेयो रुग्णालयात ३३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर खासगीत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसातील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील मृत्यूदरामध्ये मोठी तफावत नसल्याचे दिसून येते. दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या १३ हजारावर चाचण्या झाल्या आहेत. यातील ३ हजार १५० जण बाधित आढळले. ९ टक्क्यांवर एकाच दिवशी बाधित आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाबाधितांना मुदतबाह्य गोळ्या

कोरोना नियंत्रणासाठी आवश्‍यक असणाऱ्या गोळ्या मुदतबाह्य होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये मुदतबाह्य होत असलेल्या औषधांचे वितरण महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाबाधितांना देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला आहे. 

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT