testing of corona super spreader in nagpur says guardian minister nitin raut 
नागपूर

'नव्या स्ट्रेनपासून सावध राहा, नागपुरात कोरोनाच्या 'सुपर स्प्रेडर'च्या होणार चाचण्या'

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. झपाट्याने पसरणाऱ्या या नव्या स्ट्रेनपासून सावध राहा. तसेच रुग्णसंख्या कमी करण्यासाठी चाचण्या आधीच्या तुलनेत तिप्पट वाढविल्या असून सुपर स्प्रेडर्सच्या चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दोन दिवसांपासून बाधितांच्या संख्येने अकराशेपेक्षा जास्त आकडा गाठला आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. गुरुवारी १,११६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर मृत्यूचा टक्काही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज मागील दोन महिन्यानंतर मृत्यूचा टक्का वाढल्याचे दिसून आले. १३ मृत्यूची नोंद झाली आहे. 

एकाच दिवशी १३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये ९ मृत्यू हे शहरातील आहेत. २ मृत्यू ग्रामीण भागातील तर २ मृत्यू जिल्ह्याबाहेरून रेफर झालेल्या रुग्णांचे आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण मृत्यूची संख्या ४ हजार ३१४ झाली आहे. तर नवीन कोरोनाबाधितांमध्ये शहरातील ८२६ , ग्रामीणचे २८८, जिल्ह्याबाहेरील २ अशा एकूण १ हजार ११६ बाधितांचा समावेश झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४६ हजार ८३१ वर पोहोचली आहे. यात शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार २०१ तर ग्रामीण भागातील २८ हजार ६९६ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या ९३४ झाली आहे. 

नागपूर शहरातील आतापर्यंत मृत्यूची संख्या २,७९२ झाली आहे. तर ग्रामीण भागात ७७० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याबाहेरील मृत्यूची संख्या ७५२ झाली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ६५८ झाली आहे. तर ग्रामीण ६०१ अशी एकूण ७ हजार २५९ रुग्णांवर पोहोचली आहे. १ हजार २४३ कोरोनाबाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर ४ हजार ९०० रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT