testing of Covid shield vaccine is going on in Nagpur
testing of Covid shield vaccine is going on in Nagpur 
नागपूर

नागपुरात ‘कोविशिल्ड’ लसीची चाचणी जोमात; २० जणांचे स्क्रिनिंग; आज येणार चाचण्यांचे अहवाल 

केवल जीवनतारे

नागपूर ः कोविडच्या नियंत्रणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या क्‍लिनिकल ट्रायलसाठी मंगळवारी (ता.२०) यादीतील २० जणांची निवड करण्यात आली. त्यांचे स्क्रिनिंग करण्यात आले. मेडिकल-सुपरच्या पल्मोनरी क्रिटिकल केअर मेडिसीनचे विभागप्रमूख डॉ. सुशांत मेश्राम यांनी यांचे स्क्रिनिंग केले आहे.  स्क्रिनिंग झालेल्या व्यक्तींचा अहवाल आज येणार आहे. अहवाल आल्यानंतर त्यांना लस टोचण्यात येईल.

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल)त १०० लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. देशभरातील १७ केंद्रांतून १६०० नागरिकांवर ही चाचणी होत आहे. मेडिकलमध्ये सुमारे ५० व्यक्तींना ही लस टोचण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी ५ लोकांचे स्क्रिनिंग झाले. दुसऱ्या दिवशी १५ अशा एकूण २० व्यक्तींचे स्क्रिनिंग करण्यात आले.

सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक्षमतांची मानवी चाचणी करण्यात येणार आहे. मंगळवारी २० जणांच्या विविध आजाराबाबतचा इतिहास घेण्यात आला. याशिवाय त्यांच्या रक्ताच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. मधूमेहासह इतर काही आजार आहे काय? याची तपासणी करण्यात आली. या सोबतच लस घेतल्यावर सर्वांना मेडिकलमधील डॉक्टरांच्या संपर्कात राहावे लागणार असल्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. 

अनावश्यक गर्दीत जाणे टाळण्यासह आवश्यक काळजी घेण्यात यावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी २० व्यक्तींच्या घशातील तसेच नाकातील द्रव्याचे नमुने घेण्यात आले. कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांच्या रक्ताचे नमुनेही प्रतिपिंडसह इतर काही तपासणीसाठी घेतले गेले. या सर्व तपासणींचे अहवाल बुधवारी येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच ऑक्सफोर्डची कोविशिल्ड लस घेण्यास पात्र असलेल्या व्यक्तीलाच ती लस दिली जाईल.

या प्रकल्पाचे निरीक्षक मेडिकलच्या पल्मोनरी क्रिटिकल केअर मेडिसीन विभागप्रमुख प्रा. डॉ. सुशांत मेश्राम व उपनिरीक्षक डॉ. अविनाश गावंडे आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT