nagpur zoo park sak
नागपूर

नागपूर : शाश्वत विकासासाठी निसर्ग संवर्धनाची गरज

एस.बी. शुक्रे ; जैवविविधता मंडळाचा दशकपूर्ती स्थापना दिन

सकाळ वृत्तसेवा

एस.बी. शुक्रे ; जैवविविधता मंडळाचा दशकपूर्ती स्थापना दिन

नागपूर : मानवी जीवनाच्या शाश्‍वत विकासासाठी, पर्यावरण(environment), निसर्ग संवर्धन(Nature conservation) व संरक्षण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या(mumbai high court) नागपूर खंडपीठाचे(nagpur bench) न्यायमुती एस.बी.शुक्रे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या(Maharashtra State Biodiversity Board) दशकपूर्ती स्थापना दिवसानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील, सदस्य सचिव प्रवीण श्रीवास्तव उपस्थित होते. दरम्यान, देवराई पृष्ठभाग महाराष्ट्रातील वारसा स्थळासंबंधीच्या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

न्यायमुर्ती पुढे म्हणाले, जंगलात असलेल्या धोकाग्रस्त व दुर्मिळ प्रजातींची लागवड खासगी व खुल्या असलेल्या बाहेर क्षेत्रात केल्यास त्या प्रजातीचे पुनर्वसन करणे शक्‍य होईल. ती काळाची गरज आहे. तसेच धोकाग्रस्त प्रजातींचे संवर्धन करण्याकरिता न्यायालयाकडून तसेच घटनेत असलेल्या कायदेशीर तरतुदीचा फायदा घेता येणार आहे.

प्रास्ताविकात श्रीवास्तव यांनी राज्य जैवविविधता मंडळाने राज्यात २८६४९ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच जैवविविधता व्यवस्थापन समितीद्वारे लोक जैवविविधता नोंदवह्या तयार करण्यात आल्या. आतापर्यंत जैविक संसाधनाच्या व्यावसायिक वापरातून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाला १ कोटी १९ लाख ३३ हजार लाभांश रक्‍कम प्राप्त झालेली आहे.यावेळी शेषराव पाटील यांचेही भाषण झाले. स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमाला संजय करकरे, मंडळाच्या विभागीय वनाधिकारी कल्पना टेमगिरे, विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत जनसागर उसळला, मुख्यमंत्री लोकभवनात दाखल

Colombia Plane Crash : आणखी एक भीषण दुर्घटना ! धावपट्टीवर उतरण्याआधीच विमान कोसळले, दोन खासदारांसह १५ जणांचा मृत्यू

Ajit Pawar Plane Crash : दोन्ही वैमानिकांना प्रदीर्घ अनुभव; दोघांचाही मृत्यू

Ajit Pawar: कर्तृत्ववान भाच्यासाठी रडला मामाचा वाडा

Ajit Pawar : अजितदादांची सावलीसारखी सोबत; अपघातात विश्‍वासू अंगरक्षकाचेही निधन

SCROLL FOR NEXT