... then in Medical-Mayo Plasma will go to Mumbai 
नागपूर

...तर मेडिकल-मेयोतील प्लाझ्मा मुंबईला जाणार

केवल जीवनतारे

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. यामुळे नागपुरात मेडिकल आणि मेयोत प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू केले. एका डॉक्‍टरला प्लाझ्मा देण्याचा एकदा प्रयत्न झाला. उपराजधानीत प्लाझ्मा थेरपीला यश येत असल्याचे चित्र होते. परंतु दुसऱ्यांदा डॉक्‍टरने प्लाझ्मा नाकारला आणि हा प्रकल्प अर्धवट राहिला. मात्र या प्रकल्पाला गती देण्यासाठी शासनस्तरावर प्लाझ्मा दात्याना कोरोना आर्थिक भत्ता मिळणार असल्याचे संकेत मिळाले. एका रुग्णाला प्लाझ्मा दान करण्यासाठी 2 हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. तर आतापर्यंत नागपूरात दानात मिळालेला 10 जणांचा प्लाझ्मा साठवून ठेवला आहे. दानात मिळालेल्या प्लाझ्माचा उपयोग नागपूरच्या कोविड हॉस्टिपलमध्ये होत नसल्यास मुंबईला प्लाझ्मा पाठविण्यासंदर्भात विचार करण्यात येणार आहे. असे संकेत नुकत्याच झालेल्या बैठकीतून मिळाले आहेत. 

नागपुरात आतापर्यंत अडीच हजारांवर कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यातील 1620 जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त व्यक्तींचे समुपदेशन करून त्यांच्याकडून अत्यवस्थ कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवण्यास प्रभावी ठरणारा प्लाझ्मा मिळूनही मेडिकल आणि मेयो प्रशासनाकडून तो अत्यवस्थ रुग्णांना का दिला जात नाही, यावर प्रशासन चुप्पी साधून आहे. कोणीही अधिकारी "ब्र' शब्द काढत नाही. नागपूरच्या मेडिकल, मेयोसह राज्यातील सर्वच शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालये आणि मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांत 29 जून रोजी एकाच वेळी प्लाझ्मा थेरपीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला होती. 

कोरोना प्रोत्साहन भत्ता

या प्रकल्पाची जबाबदारी नागपूरच्या मेडिकलकडे सोपविण्यात आली आहे. नागपूरच्या मेयो, मेडिकलमधून 1620 कोरोनाबाधित बरे झाले. मात्र, या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांत केवळ 10 जणांनीच प्लाझ्मा दान दिला आहे. सध्या नागपूरच्या मेडिकल, मेयो आणि एम्स या तीन शासकीय रुग्णालयांसह वोक्‍हार्ट या खासगी रुग्णालयांसह दोन कोविड सेंटरमध्ये सध्या 925 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. प्लाझ्मा थेरपीची सुविधा नागपुरात उपलब्ध आहे, परंतु प्लाझ्मा दान दात्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोरोना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री यांच्या साहाय्यता निधीतून प्लाझ्मा दात्यांना 2 हजार रुपये देण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी एक दिवस रुग्णालयात यावे लागते.त्या दिवशीची रोजंदारी तसेच खानपानाचा खर्च असा एक दिवसाचा 2 हजार रुपये देण्यात येईल. राज्यात उपचारासाठी आवश्‍यक त्या संख्येने प्लाझ्मा मिळत नाही. त्यामुळे शासनाने आता प्लाझ्मादान वाढवण्यासाठी कोरोनामुक्तांसाठी प्रोत्साहन भत्ता सुरू केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या खूनासाठी अडीच कोटींची डिल? धनंजय मुडेंचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे PA कांचन?

Katrina Kaif baby boy: मुलगा झाला रे! विकी कौशल आणि कतरिनाला पुत्ररत्न, सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हणाले..

Latest Marathi News Live Update :तुम्हाला नाक घासायला लावेन हे लक्षात ठेवा, मनोज जरांगेंचा इशारा

HF Deluxe 100cc : येणार CD 100ची आठवण! हिरोने आणली स्वस्तात मस्त बाईक; फीचर्स एकदम दमदार, डिस्काउंट ऑफर्ससह EMI फक्त 799

ठरलं तर मग! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार 'या' दिवशी उडणार, उदयपूरमध्ये होणार शाही विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT