thief took advantage of quarantine
thief took advantage of quarantine 
नागपूर

कुटुंब केले होते क्वारंटाइन, चोरट्यांनी असा घेतला संधीचा फायदा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांना क्वारंटाइन करण्यात येते. परंतु, याचा फायदा आता चोरटेसुद्धा उचलू लागले आहे.

संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाइन केल्याने घरी कुणीच नसल्याचा फायदा चोरट्यांनी घरातील लाखोंचा माल लंपास केला. क्वारंटाइन क्षेत्रात पोलिसांचा बंदोबस्त असतो. असे असतानाही चोरट्यांनी हात साफ केल्याने सुरक्षायंत्रणेवर प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 

अजनी ठाण्यांतर्गत चंद्रमणीनगर परिसरात कोरोना रुग्ण मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले. गल्ली नंबर 5 येथील जवळपास संपूर्ण नारिकांना क्‍वारंटाइन करण्यात आले.

बाहेर पोलिसांना बंदोबस्त लावण्यात आला. येथील पूजा प्रशांत वाडके यांच्या कुटुंबीयांना वाठोडाच्या सिम्बॉयसिसमध्ये क्वारंटाइन केले होते. यामुळे घराला कुलूप होते. घरात कुणीच राहत नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. 26 जून ते 28 जूनदरम्यान अज्ञात आरोपीने तळमाळ्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

बेडरूमच्या कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख 70 हजार, असा एकूण 1.34 लाख रुपयांच्या मालावर हात साफ केला. पूजा प्रशांत वाडके (40) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरी गेलेली रक्कम नुकसानभरपाईच्या स्वरूपात पोलिसांनी परत करण्याची मागणी कृष्णा दहिवसे, पुला वाडके, रोहित रामटेके, बरुण कांबळे, सुधीर गजभिये, सूरज धोगडे, स्वप्नील मसारकर, किशोर मसारकर, संदेश नगरारे, विजय काले आदींनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT