thieves stole truck from police station in nagpur 
नागपूर

चोरटे जोमात पोलिस कोमात! चक्क ठाण्यातून ट्रक चोरीला; नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन 

अनिल कांबळे

नागपूर : क्रीकेट सट्टेबाजापासून ते गंगाजमुनातील वारांगणांकडून पैसे वसुली करण्याचा प्रताप करणाऱ्या लकडगंज पोलिसांचा आणखी एक प्रकार उघडकीस आला. चोरट्याने चक्क लकडगंज पोलिस ठाण्यात उभा असलेला जप्तीचा ट्रक चोरून नेला. सामान्यांची सुरक्षा करण्याचा दावा करणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या ताब्यात असलेल्या मुद्देमालाचे रक्षण करता येत नाही, अशी चर्चा रंगू लागली असून यामुळे पोलिसांची इभ्रत पणाला लागली आहे.

गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून ट्रक चोरास पकडले. २० टन लोखंडी सळाखीसह ट्रक आणि चोर लकडगंज पोलिसांच्या सुपूर्द केला. मात्र, जामीनावर सुटल्यानंतर त्याच चोराने लकडगंज पोलिस ठाण्यासमोर ठेवलेला ट्रक पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा चोरून नेला. पोलिसांना आव्हान देणारी घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास लकडगंज पोलिस ठाण्यासमोर घडली.

या घटनेमुळे लकडगंज पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाला आहे. संजय ढोणे (५२ रा. झिंगाबाई टाकळी) असे ट्रक चोराचे नाव आहे. चोरीचा ट्रक आणि लोखंडी सळाख जप्त करून मुद्देमालासह लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिला होता. पोलिस कारवाईनंतर ट्रकचोराला न्यायालयात हजर करण्यात आले. कायदेशिर कारवाई पूर्ण नसल्याने लोखंडी सळाखीसह ट्रक लकडगंज ठाण्यासमोरच होता. पोलिसांच्या नजरेसमोर असतानाही ट्रक सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरून नेला.

अशी झाली चोरी

नेताजीनगर निवासी फिर्यादी संतोष पांडे (३८) हे दहा चाकी ट्रकने २० टन सळाख भरून निघाले. सकाळी ७.३० वाजता सदर ट्रक लकडगंज हद्दीतील पुष्कर समाज भवन समोर उभा करुन ते आंघोळीला गेले. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने लोखंडी सळाखीसह ट्रक घेवून पळाला. ही घटना १० ऑक्टोबरला घडली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार कडक शिस्तीचे अधिकारी आहेत. मात्र, त्यांच्या आदेशाला ठाणेदार गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रक चोरून नेण्याची हिम्‍मत चोरटे करीत असतील तर लकडगंज पोलिसांचा किती वचक गुन्हेगारांवर आहे, याची प्रचिती येते. त्यामुळे आता खुद्द पोलिस आयुक्तांनाच गांभीर्य दाखवणे गरजेचे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT