Thirteen more died of corona virus in Nagpur 
नागपूर

कोरोनामुळे आणखी १३ मृत्यू; ४०५ नवे रुग्ण आढळले

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात कोरोनाबळींच्या संख्येत आज वाढ झाली. गेल्या २४ तासांत १३ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय दिवसभरात ४०५ नवे बाधित आढळून आले.

दिवाळीपूर्वी दोनशेपर्यंत बाधित तर एक अंकी आकड्यावर असलेली मृत्युसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणची झोप उडाली आहे. गेल्या २४ तासांत १३ बळींची नोंद करण्यात आली. यात शहरातील सात जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागात केवळ एका जणाचा कोरोनाने मृत्यू झाला तर शहराबाहेरील ५ जणांचा समावेश आहे.

यासह जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या तीन हजार ७४८ पर्यंत पोहोचली आहे. ४०५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात शहरातील ३५० तर ग्रामीणमधील ५० जणांचा समावेश आहे.

शहराबाहेरील पाच जण बाधित आढळून आले. बाधितांची एकूण संख्या एक लाख १४ हजार ९३१ पर्यंत पोहोचली. यात शहरातील ९० हजार ९२५ असून २३ हजार २९४ ग्रामीण भागातील आहेत. परराज्य तसेच इतर जिल्ह्यातून आलेले ७१२ जण आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळले.

३६३ जण कोरोनामुक्त

दरम्यान, ३६३ जण कोरोनामुक्त झाले. यात शहरातील ३१५ तर ग्रामीण भागातील ४८ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्तांची एकूण संख्या १ लाख ५ हजार ५१७ पर्यंत पोहोचली आहे. शहरातील ८३ हजार ५२३ तर ग्रामीण भागातील २१ हजार ९९४ बाधित कोरोनामुक्त झाले. शहरात सध्या ५ हजार ६७९ रुग्‍ण सध्या उपचार घेत आहेत.

विमानाने आलेला एक प्रवासी पॉझिटिव्ह

काल, रविवारी नागपूर येथील विमानतळावर अहमदाबाद येथून एक तर दिल्लीवरून चार विमाने आली. यातून ६४४ प्रवासी शहरात दाखल झाले. लक्षणे असलेल्या ३१ जणांची चाचणी करण्यात आली. या चाचण्यांचा अहवाल आज आला असून, एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे परराज्यातून विमानाने आलेल्या बाधितांची संख्या २४ पर्यंत पोहोचली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT