पचखेडी : घरोघरी जाऊन सहकाऱ्यांसह करवसुली करताना खंडविकास अधिकारी हिरूडकर.  
नागपूर

शाब्बास रे पठ्‌ठे ! एका दिवसात तीन लाखांची करवसुली !

सकाळ वृत्तसेवा

पचखेडी (जि.नागपूर) :  ग्रामपंचायत ही देशाची संसद आहे. येथील विकासासाठी करवसुली हा भाग महत्त्वाचा असतो. त्यासाठी ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना मोठा आटापिटा असतो. येथील पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी एम. बी. हिरुडकर यांनी शक्‍कल लढवित एका दिवसात तीन लाखांची करवसुली केल्याचे कार्य केल्यावरून परिसरात त्यांच्या कार्याची चर्चा आहे.

कुही पंचायत समिती बीडीओच्या नेतृत्वात स्तुप्त उपक्रम

खंडविकास अधिकारी हिरूडकर यांनी 59 ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी व पंचायत अधिकारी यांचे तिन पथके नेमून गावकऱ्यांना घरांचा कर भरणा केल्याने गावाचा विकास कसा साधता येतो व आपल्या कुटुंबाप्रमाणे गावाचा कारभार कसा सुलभ चालवू शकतो, याची माहिती समजावून सांगितली. पहिल्याच टप्प्यात मंगळवारी (ता.25) तीन लाखांच्या जवळपास वसुली करण्यात आली. यासाठी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी हिरूडकर स्वतः अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत गावात फिरतात व ग्रामस्थांना हे समजावून सांगतात.

शंभर टक्‍के वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
मंगळवारी करभरणा पथकाने गटग्रामपंचायत पचखेडी येथील सत्तर हजार रुपये, मांढळ येथील पंचेचाळीस हजार रुपये, आकोली येथील पंचेचाळीस हजार रुपये, तितूर अठ्ठेचाळीस हजार, वेलतूर तीस हजार रुपये अशी तीन लाखांच्या जवळपास वसुली केल्याची माहिती पंचायत अधिकारी ढेंगे यांनी दिली. याचाच भाग म्हणून देवळीखुर्द व चितापूर या ग्रामपंचायतने शंभर टक्के करवसुली केल्याने देवळीखर्दचे ग्रामसेवक मंगेश पाटील व चितापूरचे ग्रामसेवक त्र्यंबक गिरमकर यांचा पंचायत समितीच्या वतीने सत्कारही करण्यात आला. असेच नागरिकांनी सहकार्य केल्यास येत्या मार्चअखेरपर्यंत नव्वद टक्के करवसुली पूर्ण करू व त्यासाठी तालुक्‍यातील पुढारी व नागरिक सहकार्य करणार असल्याचे खंडविकास अधिकारी हिरूडकर यांनी सांगितले.
 

आत्मविश्‍वास वाढला
घरटॅक्‍स वसुली ही ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकाची मोठी डोकेदुखी असते. त्यासाठी बीडीओंनी सुरू केलेला उपक्रम सुंदर असून ग्रामसेवकांचा आता आत्मविश्वास वाढला आहे.
श्री.चांदूरकर
अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना कुही तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT