Total 260 people are no more in december due to Corona in Nagpur  
नागपूर

नागपूरकरांनो सावधान! कोरोना अजूनही घालतोय थैमान; महिनाभरात तब्बल २६० रुग्णांनी गमावले प्राण 

केवल जीवनतारे

नागपूर ः वर्षाचा शेवटच्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाला असल्याचे दिसून आले. तीनशे ते चारशेच्या दरम्यान कोरोना बाधित सापडत आहेत. हीच गती शेवटपर्यंत राहिली. चाचण्यांची संख्या वाढल्यानंतरही गुरूवारी नव्याने ३९३ बाधितांची भर पडली आहे. तर २४ तासांमध्ये ८जण दगावले आहेत. ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये मृत्यूमध्ये घट दिसून आली. डिसेंबरमध्ये २६० जण दगावले आहेत. नवीन कोरोना स्ट्रेंनचे भय नागरिकांच्या मनात दिसून येत नाही. गुरूवारी नव्याने आढळलेल्या ३९३ बाधितांमुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २३ हजार ७६७ वर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यूंची संख्या ३ हजार ९३० झाली आहे.

जिल्हयात आता रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या देखील वेगाने कमी होताना दिसत आहे. सद्या केवळ ८८५ गंभीर कोरोनाबाधित मेडिकल, मेयो, एम्ससह इतर रुग्णालयात दाखल आहेत. यामुळेच मृत्यूमध्ये घट होताना दिसते. २४ तासांत दगावलेल्या ८ बाधितांमध्ये शहरातील ४, ग्रामीण भागातील १ तर जिल्ह्याबाहेरचे ३ मृत्यू आहेत. विशेष असे की, आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ९८ हजारावर पोहोचली आहे. 

जिल्ह्यात आज ४ हजार ९६६ चाचण्या झाल्या आहेत. यापैकी खासगी प्रयोगशाळेमध्ये १६४१ चाचण्या झाल्या आहेत. सरकारी प्रयोगशाळेपेक्षा खासगीत चाचणी करण्याचा कल नागरिकांमध्ये दिसून येत आहे. नीरी प्रयोगशाळेमध्ये एकही चाचणी गुरूवारी करण्यात आली नाही. तर एम्समध्ये ४७४ चाचण्या झाल्या आहेत. यातील ८जण बाधित आढळली. तर मेडिकलमध्ये ७३० चाचण्या झाल्या असून यातील ३९ बाधित आढळले. मेयोतील ९५१ चाचण्यांमध्ये ७९ बाधित आढळले तर माफसूमधील ७८ चाचण्यांमध्ये १२ जण बाधित आढळले. ६६४ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. गृहविलगीकरणात २ हजार ५०४ कोरोनाबधितांवर उपचार सूरू आहेत. आज ३३५ जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत कोरोनामुक्तांची संख्या १ लाख १६ हजार ५५ झाली आहे.

कोरोनाच्या नवीन स्ट्रेन आणखी एक संशयित दाखल

मेडिकलमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे संशयित सात जण दाखल करण्यात आले आहेत. यात दोन महिलांसह एक सहा वर्षाचा मुलाचा समावेश आहे. तर चार पुरुष दाखल आहेत. गुरूवारी (ता.३१) रात्री उशीरा कोरोनाच्या नवीन बदलत्या स्ट्रेनचा संशयित कोरोनाबाधित दाखल झाला आहे. त्यालाही मेडिकलच्या पेईंग वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. ब्रिटन प्रवासाच पार्श्वभूमी असून कोरोनाबाधित आढलल्यामुळे त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. सद्या दाखल असलेल्या ८ जणांची प्रकृती ठणठणीत आहे.

असे आहेत जिल्ह्यातील कोरोना मृत्यू

-एप्रिल -२ मृत्यू
-मे -९ मृत्यू
-जून -१४ मृत्यू
-जुलै -९३ मृत्यू
-ऑगस्ट -८६१ मृत्यू
-सप्टेंबर -१३७६ मृत्यू
-ऑक्टोंबर -६०२ मृत्यू
-नोव्हेंबर -२५८मृत्यू ,
-डिसेंबर -२६० मृत्यू

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT