Tractors will also run on bio CNG 
नागपूर

नितीन गडकरी म्हणाले, विदर्भातील ट्रॅक्टर बायो सीएनजीवर आणण्याचा प्रयत्न

राजेश चरपे

नागपूर : विदर्भातील ट्रॅक्टर बायो सीएनजीवर आणण्याचा प्रयत्न आहे. नागपुरात सार्वजनिक वाहतुकीतील ८० बस बायो सीएनजीवर धावत आहेत. भविष्यात ४०० बस सीएनजीवर येतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

बस प्रवासातील तिकिटांमध्ये गडबड होत असल्याने ई तिकीट सुरू केले जातील. तसेच डिझेल आणि पेट्रोलची आयात बंदच करायची असून बांधकामाच्या मशीनही जैविक इंधनावर रूपांतरित व्हाव्या यासाठी प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.

वायुप्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी व चाळीस हजार कोटींच्या कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने किंवा जैविक इंधनावर चालणारी वाहने हा पर्याय आहे. भविष्यात याकडे देशाला वळावे लागेल, असेही नितीन गडकरी म्हणाले.

तेलाच्या आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येतो. केवळ वाहनांमुळे वायुप्रदूषण होते असे नाही तर अन्य कारणेही आहेत. आज देशात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहने प्रदूषणमुक्त आणि परवडणारी आहेत. वाहन कंपन्यांनी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत वाहनांच्या किमती कमी केल्या तर ही वाहने रस्त्यावर अधिक दिसू शकतील, असे नितीन गडकरी म्हणाले.

डिझेल, पेट्रोलला इलेक्ट्रिक किंवा जैविक इंधनाचा पर्याय समोर आला आहे. कौशल्याधिष्ठित मनुष्य, उच्च तंत्रज्ञान, कच्चा माल उपलब्ध असल्यामुळे भविष्यात देश ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रमांक एकचे स्थान प्राप्त करेल. सार्वजनिक वाहतुकीसाठी इथेनॉल, मिथेनॉल, बायो सीएनजी, विजेचा इंधन म्हणून वापर केला तरच ही सेवा परवडणारी ठरेल, असे गडकरी यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT