tukaram mundhe ordered for giving refund to patients to seven star hospital  
नागपूर

मोठी बातमी :आयुक्त तुकाराम मुंढेंचा खाजगी रुग्णालयांना दणका.. सेव्हन स्टार हॉस्पिटलला रुग्णांचे इतके लाख परत देण्याचे निर्देश 

राजेश प्रायकर

नागपूर :  जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलवर महापालिकेने पाच लाख रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम तीन दिवसांत महापालिकेत जमा करण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. एवढेच नव्हे रुग्णांकडून उकळण्यात आलेले अवाजवी ६.८६ लाख परत करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. 

राज्य सरकारने कोव्हीडसह विविध आजाराच्या रुग्णासाठी ठरवून दिलेल्या शुल्काशिवाय जास्त शुल्क आकारणे, कोव्हीड रुग्णांसाठी ८० बेडचे आरक्षण धुडाकावून लावल्याप्रकरणी सेव्हन स्टारवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना कोव्हीड रुग्णांसाठी आकारण्यात येणारे शुल्क ठरवून दिले आहे. परंतु राज्य सरकारच्या आदेशाला पायदळी तुडवित जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पीटलने रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचे महापालिकेच्या तपासणीत उघडकीस आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज राज्य सरकारने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त आकारलेले शुल्क रुग्णांना परत करा, असे आदेश ‘सेव्हन स्टार'ला तीन दिवसांपूर्वी दिले होते. 

६ लाख ८६ हजार ५२७ रुपये परत करण्याचे निर्देश

आज आयुक्तांनी सेव्हन स्टारने आकारलेल्या अतिरिक्त शुल्काचा आकडा निश्चित केला. रुग्णांकडून उकळलेले अवाजवी ६ लाख ८६ हजार ५२७ रुपये परत करण्याचे निर्देश दिले. सेव्हन स्टार रुग्णालयात तपासणी केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे जप्त केली होती. यात विविध आजारावरील उपचारासाठी दाखल झालेल्या ९९१ रुग्णांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. या ९९१ रुग्णांपैकी केवळ ३०४ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती सेव्हन स्टारने महापालिकेला दिली. 

पाच लाख रुपयांचा दंड

परंतु ६८७ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती दडविल्याचेही पुढे आले. याबाबतही आयुक्तांनी रुग्णालयाला स्पष्टीकरण मागितले होते. परंतु सेव्हन स्टार रुग्णालयाने समाधानकारक उत्तर न दिल्याने आयुक्तांनी आज पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. वोक्हार्ट हॉस्पटीलला रुग्णांकडून उकळलेले अवाजवी साडेनऊ लाख रुपये परत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी वोक्हार्टने रुग्णांना उकळलेले अवाजवी शुल्क परत केले.

दीड लाखांपर्यंत अतिरिक्त उकळले

सेव्हन स्टार हॉस्पिटलने महापालिकेकडे दिलेल्या रेकॉर्डनुसार विविध आजाराच्या रुग्णांकडून दीड लाखांपर्यंतची रक्कम अधिक उकळल्याचे पुढे आले. जयंत मेश्राम या रुग्णाकडून हॉस्पिटलने २ लाख २१ हजार ३९० रुपये घेतले. मुळात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार त्यांच्याकडून ६९ हजार ४१९ रुपये घेणे अपेक्षित होते. त्यांना १ लाख ५१ हजार ९७१ रुपये परत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याशिवाय आणखी ३७ रुग्णांकडून अवाजवी शुल्क उकळण्यात आले.


संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT