Tukaram Mundhe warned the private hospital  
नागपूर

तुकाराम मुंढेंनी `या` हॉस्पिटलला दिला इशारा. म्हणाले, रुग्णांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करा अन्यथा...

राजेश प्रायकर

नागपूर  ः कोरोनाबाधितांची शुल्क वसुलीच्या नावावर लूट करणाऱ्या वोक्हार्ट हॉस्पिटलला पालिकेने ४ ऑगस्टला नोटीस बजावून अनेक अनियमिततेबाबत २४ तासांत स्पष्टीकरण मागितले होते. परंतु कोविड रुग्णांसाठी ८० टक्के बेडचे आरक्षण, रुग्णांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्काबाबत स्पष्टीकरणात दुर्लक्ष करण्यात आले.

त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज आणखी एक नोटीस बजावून दोन दिवसांत तपासणीदरम्यान आढळून आलेल्या अनियमिततेबाबत तसेच रुग्णांकडून वसूल करण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्काबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे शासनाच्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क वसूल केलेल्या रुग्णांना पैसे परत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दोन दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच आणीबाणी व्यवस्थापन, अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. खाजगी रुग्णालयांवर नजर ठेवण्यासाठी विशेष गठीत पथकाने २६ जुलै रोजी वोक्हार्ट हॉस्पिटलची तपासणी केली. यावेळी अनेक रेकॉर्ड तपासण्यात आले. यातून वोक्हार्ट हॉस्पिटलकडून शासन व महापालिकेच्या नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे पुढे आले होते.  

राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी आकारण्यात येणारे शुल्क ठरवून दिले आहे. परंतु राज्य सरकारच्या आदेशाला पायदळी तुडवित वोक्हार्ट हॉस्पिटलने रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचे महापालिकेच्या तपासणीत उघडकीस आले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज राज्य सरकारने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त आकारलेले शुल्क रुग्णांना परत करा, असे आदेश ‘वोक्हार्ट'ला दिले. 

(संपादन : प्रशांत राॅय़)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT