Tukaram Mundhe's viral video Confusion among citizens
Tukaram Mundhe's viral video Confusion among citizens 
नागपूर

तुकाराम मुंढे व्हिडिओत म्हणताहेत, मास्क वापरण्याची गरज नाही!; आता म्हणाले हा नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न, वाचा सविस्तर...

अतुल मेहेरे

नागपूर : सोशल मीडियावर माझा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ एडीट करून व्हायरल करण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनासंबंधित घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेतील ‘तो’ बाइट आहे. कुणीतरी खोडसाळपणा करून आजच्या स्थितीत तो बाइट व्हायरल करीत असल्याचे महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. काय आहे त्यात वाचाच...

उपराजधानीत कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढत चालला आहे. सुरुवातीला आटोक्यात असलेली रुग्णसंख्या दिवसांणिक नवीन नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. तसेच मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाची चिंता वाढवत आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. याच कारणाने शहरा पुन्हा लॉकडाऊन करायचा की नाही यावर वारंवार चर्चा सुरू आहे. अशात एका व्हायरल व्हिडिओने नागरिकांमध्ये सभ्रम निर्माण होत आहे.

दोन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तुकाराम मुंढे नागरिकांना ‘वारंवार हात स्वच्छ धुवा, मास्क वापरण्याची गरज नाही़’ असे सांगत आहे. फक्त डॉक्टर, परिचारिका व्यतीरिक्त कुणीही मास्क घालण्याची गरज नतल्याचे सांगत आहे.

यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मार्च महिण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मला मास्क बाबतीत प्रश्‍न विचारला होता की, मास्क वापरणे बंधनकारक आहे का? त्यावेळेसच्या सरकारच्या मार्गदर्शक सूचना अशा होत्या की, जे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करतात त्यांना आणि रुग्णांना मास्क बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त इतर कुणीही मास्क वापरण्याची गरज नाही, असे स्पष्ट निर्देश तेव्हा देण्यात आले होते. त्यानुसारच मी ते वक्तव्य केले होते. त्यानंतर आयसीएमआर आणि सरकारने या मार्गदर्शक सूचना बदलविल्या आणि सांगितले की प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये ही गोष्ट मी स्पष्टपणे सांगितली होती, असे आयुक्त मुंढे म्हणाले.

हा नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न

मास्क वापरणे बंधनकारक नाही, असं मी तेव्हाच्या परिस्थितीत बोललो होतो. कुणीतरी खोडसाळपणा करून मी आता ते वक्तव्य केले, असे त्या व्हिडिओतून भासवण्याचा प्रयत्न करीत आहे. असे करून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. हा लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.

घरात सुद्धा मास्कचा वापर करा

एप्रिल महिन्यापासून घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्कमुळे विषाणूचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो, संसर्ग कमी करू शकतो. त्यामुळे मी आज पुन्हा सर्वांना विनंती करतो, की अति महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि घराबाहेर निघताना मास्कचा वापर करा. घरात एकापेक्षा जास्त लोक असतील, तर घरात सुद्धा मास्कचा वापर करावा, अशी सूचनादेखील त्यांनी केली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT