Two-and-a-half-year-old Girl died after hitting his head on the wall 
नागपूर

गच्चीवर होती खेळत, खेळता खेळता भिंतीवर आदळले डोके आणि...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : घराच्या गच्चीवर खेळत असताना अडीच वर्षीय चिमुकलीचे डोके भिंतीवर आदळले. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मारिया फिरदोस मोहम्मद आबीद असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मो. आबिद बुटीबोरीतील कंपनीत वर्कर्स मॅनेजर पदावर नोकरीवर आहेत. ते पत्नी व मुलीसह कोतवालीतील जलालपुरा परिसरात राहत होते. रविवारी दुपारी त्यांची अडीच वर्षांची मुलगी मारिया छतावर खेळत होती. दरम्यान, तिचे वडील पाण्याच्या टाकीत पाणी टाकत होते. मुलगी खेळत असताना तिच्याकडे दुर्लक्ष झाले. ती पळत असताना पॅराफीट वॉलवर आदळली. तिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

दोन दिवसांतील दुसरी घटना


पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष झाल्याने चिमुकल्यांचा जीव गेल्याची ही शहरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी हसनबागमधील सहा वर्षीय मुलीचा पाळण्याचा गळफास लागून मृत्यू झाला होता. तर दुसऱ्याच दिवशी चिमुकली छतावर पडून गतप्राण झाल्याची घटना उघडकीस आली. पालकांच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे अशा घटना वाढण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : जानेवारीच्या पगारात 8व्या वेतन आयोगाची वाढ मिळेल का? किती वाढणार पगार? जाणून घ्या पगारवाढीबाबत मोठा अपडेट

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Navneet Rana : मौलानाला चार बायका १९ मुलं, आता हिंदूंनीही ४ मुलं जन्माला घाला; भाजप नेत्या नवनीत राणांचं खळबळजनक विधान

रुग्णाला घेऊन जाणारं अमेरिकन नौदलाचं विमान कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

Supreme Court : पत्नीला खर्चाचा हिशोब ठेवण्यास सांगणे क्रूरता नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

SCROLL FOR NEXT