two candidates are contesting for the mayoral election from the Congress Nagpur political news 
नागपूर

महापालिका निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत फूट; महापौर निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे दोघांची दावेदारी

राजेश चरपे

नागपूर : पाच जानेवारीला होऊ घातलेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे दयाशंकर तिवारी तर उपमहापौरपदासाठी मनीष धावडे यांनी दावेदारी दाखल केली आहे. काँग्रेसमधील गटबाजी कायम असल्याने महापौरपदासाठी रमेश पुणेकर, मनोज गावंडे तर रश्मी धुर्वे आणि मंगला गवरे यांनी उमेदवारी अर्ज भरले.

काँग्रेसचा पराभव निश्चित असला तरी वर्चस्वासाठी शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि तानाजी वनवे यांनी आपल्या समर्थकांना उभे राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे भाजपकडे १०८ तर काँग्रेसकडे फक्त २८ नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे दोन तर राष्ट्रवादीकडे एकच सदस्य आहे.

महाविकास आघाडीकडून नगरसेवक मनोजकुमार गावंडे यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी मंगला प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले. विकास ठाकरे समर्थक रमेश पुणेकर, नगरसेविका रश्मी निलमनी धुर्वे यांनी उपहापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. बहुजन समाज पक्षाकडून नरेंद्र वालदे व उपमहापौर पदासाठी वैशाली नारनवरे यांनी नामनिर्देशन सादर केले.

महाविकास आघाडीतर्फे एकत्रित निवडणूक लढविली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ठाकरे आणि पालकमंत्री नितीन राऊत समर्थकांनी स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केल्याने महाविकास आघाडीत महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच फूट पडल्याचे स्पष्ट होते. सुमारे चार वर्षांपासून काँग्रेस गटबाजी सुरू आहे. दोन्ही गट माघार घ्यायला तयार नाही.

प्रदेशाध्यक्षांच्या पत्राकडे दुर्लक्ष

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे महापौरपदाचा उमेदवार निवडण्यासाठी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक घ्यावी अशी सूचना केली होती. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना २९ डिसेंबरला पत्रही पाठवले होते. मात्र, पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले. परस्पर उमेदवार निश्चित करण्यात आले. तसेच उमेदवारी अर्जसुद्धा दाखल करण्यात आला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT