Two children sold for six lakh in Nagpur 
नागपूर

महिलेचा पंटरशी संवाद; ‘अजून प्रसूती झालेली नाही, तुम्हाला बाळ देऊ शकत नाही’

अनिल कांबळे

नागपूर : निपुत्रीक दाम्पत्यांना हेरून त्यांच्यासाठी मुलांची तस्करी करून विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने भंडाफोड केला. सहा जणांच्या टोळीला पोलिसांना अटक केली आहे. या टोळीने साडेतीन लाखांत मुलाची तर अडीच लाखांत मुलींची विक्री केल्याची माहिती समोर आले आहे.

शर्मिला विजय खाकसे (४०, रा. इंदोरा) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तिचा पती शिक्षक असल्याचे सांगतो. मात्र, त्याचे मोबाईल साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्यांना एक मुलगी आहे. शर्मिला अनेक वर्षांपासून या व्यवसायात लिप्त असल्याचा संशय आहे. तिच्या टोळीत शैला मंचलवार (रा. दिघोरी), पूजा पटले (रा. खरबी), लक्ष्मी राणे (रा. सुभाषनगर), मनोरमा ढवळे (रा. पाचपाली) आणि सुरेंद्र पटले (४४, रा. खरबी) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानव तस्करीची टोळी शहरात सक्रिय आहे. ते लहान मुलांची खरेदी विक्री करीत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पीआय सार्थक नेहेते यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. संशयाच्या आधारावर शर्मिला खाकसे हिच्याशी संपर्क साधला. सापळ्यानुसार शर्मिला दोन साथीदारास उंटखाना परिसरात आली. पथकातील पोलिसांनी शर्मिलाशी संपर्क साधला. मुलाची गरज असल्याचे भासविले.

ठरल्याप्रमाणे मुलगा साडेतीन लाखात तर मुलगी अडीच लाखांत विक्री करीत असल्याचे शर्मिलाने सांगितले. मात्र, अजून त्या महिलेची प्रसूती झाली नाही. त्यामुळे तुम्हाला बाळ देऊ शकत नाही असे शर्मिलाने पंटरला सांगितले. पंटरने शर्मिलाच्या हाती पैसे दिले आणि मुलगी घेतली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पथकाने शर्मिला आणि तिच्या दोन साथीदारांना रंगेहात पकडले. तिच्या साथीदारांनाही अटक केली.

किती बालकांची विक्री?

शर्मिला टापटीप राहते आणि दुसऱ्यावर प्रभाव पाडते. तिचे काही नातेवाईकही या धंद्यात गुंतले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आतापर्यंत शर्मिलाने ३० पेक्षा अधिक बालकांची विक्री केली असावी. तिने शैला मंचलवारच्या १२ दिवसांच्या मुलाची विक्री केली होती. गरीब दाम्पत्यांना पैशाचे आमिष दाखवून शर्मिला लखपती झाली. त्यामुळे तिचे जाळे अन्य शहरात आहेत काय? याचा तपास पोलिस करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT