वाडी : नवनीतनगर हा परिसर सील केल्यानंतर तैनात असलेले पोलिस कर्मचारी.  
नागपूर

दोन दिवसांपासून होता मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि ऐनवेळी ओढवले संकट, मग घडले असे....

सकाळ वृत्तसेवा

वाडी (जि.नागपूर): आषाढी एकादशीनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून मंदिरात उत्साहात पुजा सुरू होती. त्यानिमित्त मंदिरात भजन पुजनाचे कार्यक्रम सुरू होते. परंतू ऐनवेळी या पुजेवरच संकट ओढवले. आता या संकटामुळे मंदिराचे व्यवस्थापन व नागरिक भयंकर अडचणीत आले आहेत.
 
अधिक वाचा : अबब ! बिडीओंच्या निरोप सोहळयाला मंत्री, आमदारांसह अन्य लोकप्रतिनिधी, काय झाले असे...

चिंतेत अधिकची भर
नागपूर शहरालगत असलेल्या वाडी परिसरातील नवनीतनगर भागात पुन्हा एक संकट ओढवले. एक पुरूष कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य विभाग व न.प.प्रशासनाच्या चिंतेत अधिकची भर पडली. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार न.प. परिसरात दररोज घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षण अधिकाऱ्याला या व्यक्‍तीत कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे मंगळवारी निदान करण्यासाठी पाठविण्यात आले. रात्री पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने तहसिलदार मोहन टिकले ,मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन हेमके, व्याहाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा धुर्वे, वाडी न.प.चे आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे रात्री12.30 वाजता नवनीतनगरमधील बाधीतांच्या घरी पोहचून बाधिताच्या कुटुंबातील सदस्यांना क्‍वारंटाईन सेंटरला तपासणीसाठी नेण्यात आले.

अधिक वाचा : महिला म्हणते या गावावर माझी मालकी, संपूर्ण गाव खाली करा...

बाधित आला मध्यप्रदेशातून
बाधित इसम मध्यप्रदेश येथून आला होता. त्याला सर्दी, खोकला यासारखी लक्षणे दिसून आली. त्यांचा पाण्याचे कॅन सप्लाय व चाईनीज नुडल्स विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या घराशेजारी मंदिर असून ही व्यक्‍ती मंदिराची मुख्य आहे. दोन दिवसांपासून तिथे लाऊडस्पीकर लावून मंदिरात पूजा सुरू होती. त्यामुळे अधिक लोकांना संक्रमण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
स्वयंस्फूर्तीने त्यांच्या संपर्कात येण्याऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन न.प. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वाडी नगरपरिषदेने केले आहे. रात्री मुसळधार पाऊस असूनसुध्दा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाधितांचे निवासस्थान भागातील परिसर सील करण्याचे काम पूर्ण केले. यावेळी वाडी पोलिस कर्मचारीसुध्दा तैनात करण्यात आले. आता वाडी न.प. क्षेत्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 झाल्याने वाडीच्या नागरिकांची व वाडी न.प. प्रशासनाची चिंता वाढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT