Two girl lost jewelry on their bodies 
नागपूर

दोन एकाकी मैत्रिणींना वाटेतच गाठून ठगबाजांनी फेकले जाळे; लोभापायी घडले अघटित

योगेश बरवड

नागपूर : दोन एकाकी मैत्रिणींना वाटेतच गाठून ठगबाजांनी त्यांच्यावर जाळे फेकले. कापडात गुंडाळलेले दोन लाख रुपयांचे पैशांचे बंडल दाखवून त्यांच्याकडून दागिने व मोबाईल घेतले. त्यानंतर कापडात गुंडाळलेले पैशांचे बंडल देत लगबगीने पसार झाले. थोड्याच वेळात मैत्रिणींनी कापडाच्या आतील बंडल तपासले असता ते निव्वळ कागदच असल्याचे दिसून आले. फसवणुकीची ही घटना लकडगंज हद्दीत घडली.

डिप्टी सिग्नल, कळमना येथील रहिवासी दुर्गा रवी शाहू (२७) ही गुरुवारी दुपारी सुनिता शाहू नावाच्या मैत्रिणीसोबत कामानिमित्त पायीच भंडारा रोडने जात होती. वाटेत २० ते २७ वर्षे वयोगटातील दोन अनोळखी युवक त्यांना भेटले. त्यापैकी एकाने बुटीबोरी किती लांब आहे, असा प्रश्न केला. ती माहिती देत असतानाच आरोपींनी सोबत असलेला व्यक्ती गतिमंद असून त्याच्याकडे दोन लाख रुपये असल्याची बतावणी केली. थोडे बाजूला चालण्याची विनंती केली.

आरोपी त्यांना जवळच असलेल्या बँकेच्या बाजूला घेऊन गेले. तिथे एका कपड्यामध्ये गुंडाळलेले नोटांचे बंडल दाखविले. हे दोन लाख रुपये असून तुमच्याजवळ ठेवून घ्या. त्याबदल्यात तुमच्या जवळचे दागिने व मोबाईल मला द्या, असा प्रस्ताव ठेवला. दागिन्यांच्या तुलनेत मिळणारी रक्कम फार अधिक असल्याने दोघीही लोभापायी दागिने देण्यास तयार झाल्या.

सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल काढून दोघींनी आरोपींना दिला. यानंतर आरोपी कापडात गुंडाळलेले बंडल देऊन निघून गेले. मैत्रिणींनी कपड्यामध्ये ठेवलेले नोटांचे बंडल उघडले असता केवळ कागदी नोटा असल्याचे दिसले. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत ठगबाजांचा शोध सुरू केला आहे.

चक्रपाणीनगर, पिपळा रोड येथील रहिवासी किशोर टेकाडे (४९) यांचा कापूर तयार करण्याचा घरगुती व्यवसाय आहे. कापूर तयार करण्यासाठी विशिष्ट पावडरची गरज असते. टेकाडे यांनी गुगलच्या मदतीने कच्चामाल उपलब्ध करू देणाऱ्याचा शोध घेतला. त्यातून अहमदाबाच्या होम इंडस्ट्रीजबाबत माहिती व मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर संपर्क साधला असता पलीकडून बोलणाऱ्याने आपले नाव राहुल सांगितले.

सोबत कापूर तयार करण्यासाठी पावडर पाठविण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी अहमदाबादच्या बँक ऑफ कॅनराचा अकाउं नंबर देऊन गुगल पेने पैसे पाठवण्यास सांगितले. त्याप्रमाणे टेकाडे यांनी आपल्या खात्यातून आरोपीच्या खात्यात एकूण एक लाख १५ हजार ५० रुपये वळते केले. पण आरोपीने पावडर पाठविली नाही. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा नोंदवीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर, ४०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT