Two more corona positives in Nagpur
Two more corona positives in Nagpur 
नागपूर

CoronaVirus : नागपुरात रुग्णांची संख्या पोहोचली तीनवर, एकाची प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशासह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. नागपुरात बुधवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शुक्रवारी आणखी दोघांना कोरोनाची लागन झाल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणखी दोघांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

अमेरिकेतून पाच दिवसांपूर्वी शहरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्या व्यक्तीच्या संपर्कातील दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहेत. कोरोना ग्रस्तांमध्ये रुग्णाची पत्नी आणि एकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. एकट्या नागपुरात कोरोनाचे एकूण तीन रुग्ण आढळून आले आहेत. 

पहिल्या रुग्णाची प्रकृती स्थिर

नागपुरात आढळलेला कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सध्या स्थीर आहे. त्याचा ताप कमी झाला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 15 पैकी 12 जणांची चाचणी झाली आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना केले वृत्ताचे खंडण

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना कोरांना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त एका सोशल वेबसाईटरवर प्रकाशित झाले होते. यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर चुकीचे वृत्त प्रसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. 

...तर तो संशयित

एखाद्याला ताप आला, त्यावर उपचारासाठी टॅबलेट दिली. परंतु, त्याच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसेल तर त्याला संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल. विदेशातून आलेल्यांनी चौदा दिवसांपर्यंत घरीच राहावे, असे आवाहन कुकरेजा यांनी केले होते.

नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक

महापालिकेने 0712-2567021 हा आपत्कालीन क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयामध्ये 24 तास वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वत:ही वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायजर, पूर्णवेळ मास्क वापरावे, असे आवाहन कुकरेजा यांनी केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

IPL 2024 : पावसामुळे 18 मे होणारा RCB Vs CSK सामना रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला मेरील स्ट्रीप यांचा सन्मान ; आईला केला पुरस्कार समर्पित

SCROLL FOR NEXT