Two patients with scrub typhus were found again in the capital 
नागपूर

सावधान! स्क्रब टायफस पुन्हा आला; उपराजधानीत आढळले दोन रुग्ण

केवल जीवनतारे

नागपूर : स्क्रब टायफसच्या आजाराने २०१८ मध्ये ३३ रुग्णांचे बळी घेतले होते. तर २०१ रुग्ण आढळून आले होते. नववर्षात उपराजधानीत दोन जणांना स्क्रब टायफस असल्याचे आढळल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, महापालिकेचा आरोग्य विभाग नेहमीप्रमाणेच सुस्त आहे.

दोन रुग्णांपैकी एक रुग्ण काटोल रोड येथील हनुमाननगर (वॉर्ड नंबर १) तसेच दुसरा रुग्ण चारगाव शिवापूर येथील आहे. दोन्ही रुग्णांवर महापालिका हद्दीत उपचार झाले. जिल्ह्यात २०१९ मध्ये २१ रुग्णांसह भोपाळ, इटारशी आणि भंडारा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश होता. उर्वरित सर्व रुग्ण नागपूर जिल्ह्यातील होते.

२०१८-१९ मध्ये ऑगस्टमध्ये नागपुरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. एकट्या नागपुरात गतवर्षी १०० रुग्णांची नोंद झाली होती. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. या आजाराचे मुळ शोधून काढण्यासाठी नागपुरात दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (एनआयसीडी) पथक आले होते.

‘रॅट ट्रॅप’ लावण्यात आला होता. उंदरांच्या अंगावरील चिगर माइट्‌स काढून अभ्यासही केला होता. आता दोन जण आढळून आल्यामुळे पुन्हा स्क्रब टायफसबाबत जागरूकता अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

संशोधन दुर्लक्षित

यापूर्वी रॅट ट्रॅपअंतर्गत पकडण्यात आलेल्या उंदरावरील संशोधनाचे काय झाले हे अद्याप पुढे आले नाही. हे संशोधनच दुर्लक्षित राहिले होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर स्क्रबचे रुग्ण कमी होत असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, गारवायुक्त वातावरण स्क्रबसाठी पोषक असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT