कोंढाळी : याच शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला.  
नागपूर

ब्रेकिंग नागपूर जिल्हा : "त्या' दोघी मैत्रिणी, शेतात गेल्या कामावर आणि मौज करायला उतरल्या तळयात अन्‌ तिथेच झाला घात, वाचा...

सकाळ वृत्तसेवा

.कोंढाळी (जि.नागपूर) : येथून सात किलोमीटर अंतरावरील घुबडी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात कामावर गेलेल्या दोन अल्पवयीन मजूर मुली शेततळ्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेल्या असता, त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. दोन) दुपारी बारादरम्यान घडली. अर्चिता गोमेश्वर मंगाम (वय 10), भाग्यश्री विजय येडमे (वय 11, दोन्ही रा. घुबडी) अशी मृत मुलींची नावे आहेत.

सुटया असल्याने गेल्या कामावर
कोंढाळीनजीकच्या घुबडी येथील शेतकरी सेवकराम परतेती यांची गावाच्या थोड्या अंतरावरच शेती आहे. शेतात प-हाटीची लागवड केली आहे. सध्या शाळेला कोरोनामुळे सुट्या आहेत. त्यामुळे काम करून कुंटुबाला मदत व्हावी म्हणून कापसाला खत देण्याकरिता गावातील चार मुली गुरुवारी सकाळी शेतात कामावर आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास कामावरून सुट्टी मिळाल्यानंतर या चार मजूर मुली शेताबाहेर घरी गेल्या, असे शेतकरी सेवकराम परतेती यांना वाटले. मात्र, अर्चिता मंगाम व भाग्यश्री येडमे या दोन मुली दुसऱ्या रस्त्याने पुन्हा शेतात परत आल्या. त्याच्याच मागे असलेल्या दुर्गा राऊत (वय 10) व भाविका मसराम (वय 11) या दोन मुली धावून आल्या. तोपर्यंत अर्चिता व भाग्यश्री या दोघीही शेतातील शेततळ्यात पोहण्याकरिता पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज नसल्याने व शेततळ्यात पाच ते सहा फूट खोल पाणी असल्यामुळे दोन्ही मुली पाण्यात बुडू लागल्या.

मैत्रिणींनी केली आरडाओरड
अन्य दोन मुली हे दृश्‍य बघून घाबरल्या व त्यांनी आरडाओरड केली. शेतात असलेले शेतकरी सेवकराम परतेती यांना माहिती दिली. त्यानंतर गावाकडे धाव घेऊन गावात माहिती दिली. अनेक तरुणांनी घटनास्थळ गाठून पाण्यातून दोघींना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती कोंढाळी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला व दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता काटोल येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. ठाणेदार श्‍याम गव्हाने यांच्या मार्गदर्शनात सुनील बन्सोड व पन्नालाल बटाऊवाले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT