unauthorized construction till 2020 will be regular soon nagpur news  
नागपूर

अनधिकृत बांधकामधारकांसाठी महत्वाची बातमी, २०२० पर्यंतचे बांधकाम होणार नियमित

नीलेश डोये

नागपूर : राज्यातील लाखो अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार आहे. गुंठेवारी कायद्यांतर्गत ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे अनधिकृत बांधकाम नियमित होणार आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. 

वाढत्या शहरीकरणामुळे विशेषतः शहरी भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले. काही विकासकांनी अनधिकृत ले-आउट पाडून त्यांची विक्री केली. विक्री करून विकासक मोकळे झाले. काही विकासकांनी अशा अनधिकृत जागांवर बांधकाम करून त्यांची विक्री केली. सामान्य नागरिकांनी मेहनतीचा पैसा लावून घर, प्लॉट खरेदी केले. हे सर्व अनधिकृत असल्याने त्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नव्हते. शिवाय प्रशासनाकडून हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची नोटीसही बजावण्यात येते. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठी भीती असते. हे लक्षात घेता राज्य सरकाने १ जानेवारी २००१ पर्यंतचे अनधिकृत बांधकाम गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. 

सरकारने विकास शुल्क निश्चित करून संबंधित बांधकाम नियमित करण्यास परवानगी दिली. २००१ नंतरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालीत. यातील बहुतांश बांधकाम सधन व्यक्तींशी संबंधित असल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून काही अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाईसुद्धा करण्यात आली. सरकारने ३१ डिसेंबरपर्यंतचे बांधकाम नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला होता. त्यानुसार कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक विधानसभेत सादर केले आहे. यानुसार राज्यातील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 

५७२, १९०० ले-आउट - 
गुंठेवारी कायदा केल्यानंतर प्रथम नागपूर जिल्ह्यात ५७२ आणि १९०० ले-आउटमध्ये बांधकाम नियमित करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दोन टप्प्यांत बांधकाम नियमित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती. सरकारच्या निर्यणानुसार आता उर्वरित अनिधकृत ले-आउटही नियमित होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Riteish Deshmukh ने शेअर केला वडीलांचा व्हिडिओ, शिवजयींतीवर काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

Winter Olympics 2026 : स्पर्धा नेमकी कशाची? स्पर्धेला सुरुवात होताच तीन दिवसात १० हजार कंडोमचा वापर

Latest Marathi News Live Update : एसीबी ट्रॅपचा धक्का, मंत्री नरहरी झिरवळ ‘नॉट रिचेबल’; पीएवर पैसे मागितल्याचा आरोप

Mumbai News : पलाश-स्मृती मानधना वाद उच्च न्यायालयात 

Farmer Debt Relief Scheme : कर्जमाफीसाठी सरकारची तयारी; अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा, ३० जूनपूर्वी घोषणा शक्य

SCROLL FOR NEXT