villagers agitation against ration shopkeeper in parshivani of nagpur 
नागपूर

स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार, नागरिकांचा तहसील कार्यालयात ठिय्या

विजयकुमार राऊत

पारशिवनी : तालुक्यातील चारगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या वागणुकीला कंटाळून तसेच होत असलेल्या धान्य काळाबाजाराबाबत नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार केली. परंतु, संबंधितांविरुद्ध काहीच कारवाई होत नसल्याने नागरिकांनी शुक्रवारी तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा विभागासमोर दारातच ठिय्या आंदोलन केले. 

दुकानदाराकडून अनेकदा धान्यवाटप केले जात नाही. धान्य कमी देणे, ग्राहकांना उलटसुलट बोलणे, अनेकांना गहू न देता तांदूळच देणे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. बनाबाई कुभरे यांना 35 किलो धान्य द्यायचे असताना केवळ पाच किलो धान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत ग्राहकांनी संबंधित विभागाकडे दुकानदाराविरोधात तक्रारी केल्या. परंतु, कारवाई होत नसल्याने नागरिकांनी रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. दुकानदाराविरुद्ध कारवाई होणार नाही तोपर्यंत दारातच बसून राहण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. 

नागरिकांचा रोष पाहता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून संबंधित दुकानदाराविरोधात कारवाई करणयाचे मान्य केले. तसे लेखी पत्रही दिले. यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख रमेश कारामोरे, तालुका प्रमुख आकाश दिवटे, तालुका उपाध्यक्ष राधेश्याम नखाते, शेखर राऊत, अभिषेक एकूणकर, राज चव्हाण, कवडू गद्रे, संदीप शिंदे आदी सहभागी झाले. 

आमच्या विभागाला या दुकानदाराविरोधात तक्रारी मिळाल्या. लागलीच याबाबत चौकशी करण्यात आली. चौकशीत अनियमितता दिसून आली. याबाबत संबंधित दुकानदाराला पत्र देऊन महाराष्ट्र शेडयुल कमोडिटीज रेगयुलेशन 1975 च्या कलम 18(2) तरतुदीचे उल्लंघन केल्याचा ठपका संबंधित दुकानदाराला पत्र देऊन कारवाई करण्याची तंबी दिली. 
-भास्कर तोयडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Stock Limit : साठवणूक मर्यादेत वाढ सणांच्या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाला दिलासा

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी १२ विशेष लोकल! पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत सेवा, जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

पनवेल-कर्जत प्रवास सुसाट! १०.८६ किमी मार्गाचा विस्तार होणार, रोज पाच गाड्या अतिरिक्त धावणार

Ganpati Visarjan violence : गणपती विसर्जनावेळी राडा; पोलिसांनी डीजे जप्त केला अन् खासदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या

SCROLL FOR NEXT