Villagers are in tension on illegal sand smuggling in Nagpur district  
नागपूर

साहेब, अवैध वाळूचा उपसा थांबता थांबेना! तक्रार करावी कोणाकडे? गावकऱ्यांना पडला प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

कोदामेंढी (जि. नागपूर) : परिसरात वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला असून याकडे अधिकारी मुद्दामपणे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळूमाफिया चक्क गावांना जोडणाऱ्या पुलाच्या शेजारील पात्रातून, किनाऱ्यालगत शेतातून, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी शेजारून याबरोबरच योग्य वाटेल अशा ठिकाणाहून दिवसरात्र वाळूचे उत्खनन करीत आहेत. 

त्यामुळे येणाऱ्या काळात सोयीचा ठरलेला पूल, पाणीपुरवठ्याच्या विहिरी, शेती आणि नदीचे पात्र  धोकादायक होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत लोकांच्या बऱ्याच तक्रारी वाढल्या असून काहीच सार्थ होत नसल्याने आता तक्रार करावी तर कुणाकडे, असा सवाल गावकऱ्यांचा आहे. कारण सर्वच अधिकाऱ्यांची हातमिळवणी वाळूमाफियांशी आहे.

वाळूमाफियांना कसलीच मुरवत नाही. मात्र रक्षकच समजले जाणारे अधिकारी भक्षक झाल्याने आता दाद मागावी कुणाकडे असा सवाल पुढे आला आहे. मौदा तालुक्यात वाळू माफियांनी जणू आतंकच माजवीला आहे. पण त्यांच्यावर वचक ठेवणारे अधिकारी त्यांच्याच प्रवाहात वाहून गेल्याने जणू काहीच उरल्यासारखे राहिले नाही. वाळू माफियांवर वचक लावण्यासाठी महसूल विभागाने सात पथके तयार केली असली तरी फारसे काही साध्य केल्यासारखे दिसून येत नाही. शासनाने एक ब्रास वाळू चोरी करीता एक लाख ८ हजाराचा दंड निश्चित केला आहे. पण महसूल विभागाच्या सापळ्यात सापडण्याआधीच ते पलायन करतात. त्यातल्या त्यात एखाद्या अधिकाऱ्यास वाळूचा ट्रॅक्टर आढळल्यास दहा वीस हजाराची मांडवली करून सोडून दिल्या जाते. एरिया खूप मोठा असल्याने माहिती होताच वाळूचोरी पसार होतात. जे हातात लागले त्यांच्यावर कारवाई केल्या जात असल्याचे  तहसीलदार प्रशांत सांगडे सांगतात.

सुरनदीचे पात्र मोठे असून त्यातून दररोज दिवस रात्र वाळूचा उपसा सुरु आहे. वाकेश्वर नदीपात्रातून सुरु असलेला वाळूचा उपसा यामुळे पात्रावरील पुलाला धोका निर्माण होत आहे. याबरोबरच इतरही गावांना जोडणाऱ्या पुलांची देखील तीच विदारकता आहे. याबाबत गावकरी अरोली पोलिसांना सूचना देतात मात्र पोलीस टोलवाटोलव करीत वाळू माफियांनाच सतर्क करीत असल्याची ओरड आहे. तक्रारीचा पाऊस दिसताच महसूल आणि पोलीस विभाग एक दोन कारवाई करीत कारवाई सुरु असल्याचा दिखावा करतात. ठाण्याच्या हद्दीत दररोज वाळू माफीया घोंगावत असतात. 

काही वाळूमाफियांचे पोलिसांशी असलेले संबंध बघता जणू पोलीस देखील वाळूच्या धंद्यात सक्रीय असल्याचा संशय ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. वाळूचोरीमुळे शासनाचा दिवसाकाठी लाखोंचा महसूल बुडीत असून पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे. वाळूमाफियांसाठी महसूल आणि पोलीस विभाग जणू दावणीला बांधल्यासारखे झाले आहे. राजकीय पुढारी देखील पांढऱ्या पोषाखाच्या आडून या धंद्यात सहभागी असल्याने अधिकारी देखील कधीकाळी कारवाई करण्यास नरमतात. याबरोबरच वाहतूक पोलीस, वन विभाग, खनिज महामंडळ, गुन्हे शाखा यांच्या देखील कारवाया होतांना दिसून येत नसल्याने आणखी ग्रामस्थांमध्ये संशय बळावला आहे. मात्र यावर वरिष्ठ पातळीवर आणि शासनाने दखल घेणे तितकेच गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

Women's World Cup : हर्लीन देओलचा प्रश्न अन् लाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी; वर्ल्ड कप विजेत्या पोरींना आवरेना हसू Video Viral

Vayuputhra : हे आहे 'वायुपुत्र'! भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट; कितीहीवेळा करा चार्जिंग, लवकरच स्पेसमध्ये जाणारा हा चमत्कार एकदा बघाच

Pune Car Accident : पुण्यात आणखी एक भीषण अपघात ! पौड रस्त्यावर मेट्रो पिलरला कार धडकली अन्...

Rahul Gandhi: ‘मतचोरी’चा बॉम्ब फोडणाऱ्या काँग्रेस उमेदवाराचीच डबल नोंदणी! पुरावा पाहा...

SCROLL FOR NEXT