World Water Day 2021 PMC is focusing 24 hours and equal water distribution in next 30 year 
नागपूर

नागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली; महिनाभरात तीस टक्के भर

राजेश प्रायकर

नागपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच तसेच नवेगाव खैरी जलाशयांमध्ये महिनाभरात ३० टक्के पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे यंदा शहरासाठी मुबलक पाणीसाठा तयार झाला. काही दिवसांत पाऊस कायम राहिल्यास पेंच धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवेगाव खैरी जलाशयातही ८० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असल्याने यंदाचा उन्हाळा पाण्याबाबत नागपूरकरांना सुसह्य ठरणार असल्याचे संकेत मिळत आहे.

महिनाभरापासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी केवळ निम्मे भरलेली जलाशये काठापर्यंत भरल्याचे दिसून येत आहे. श्रावण सरींनीही काही प्रमाणात जलाशये भरली तर भाद्रपदातही पावसाने आषाढातील दणका दिला. ऊन-पावसाच्या खेळात जलाशये चांगलीच भरल्याचे दिसून येत आहे.

शहराला तोतलाडोह येथील पेंच जलाशय तसेच नवेगाव खैरी येथील जलाशयातून वर्षभर पाणीपुरवठा होतो. ही दोन्ही जलाशये सध्या चांगली भरली आहेत. मागील महिन्यात २१ ऑगस्टपर्यंत पेंच जलाशय ६३ टक्के भरले होते. परंतु, नवेगाव खैरी जलाशयात निम्म्यापेक्षाही कमी अर्थात ४७ टक्केच पाणीसाठा होता. आता मात्र तोतलाडोह येथील पेंच जलाशय काठावर भरले आहे तर नवेगाव खैरी जलाशयातही ३१ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला.

पेंच धरणात आजच्या तारखेत ८६.३७ टक्के पाणीसाठा आहे तर नवेगाव खैरी जलाशयात ७८.७१ टक्के पाणी आहे. मागील वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी २१ सप्टेंबरला पेंच धरण ९७.१५ टक्के तर नवेगाव खैरी जलाशय ९६.५६ टक्के भरले होते.

यंदा आणखी काही दिवस पाऊस पडल्यास दोन्ही जलाशये तुडूंब भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरवासींचा येणारा उन्हाळा सुसह्य होईल, एवढा पाणीसाठा असल्याने महापालिकेचीही चिंता मिटल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचाही त्रास शहरवासीयांनी सहन केला होता.

जलाशयाची स्थिती

  • जलाशय २१ ऑगस्ट २१ सप्टेंबर

  • तोतलाडोह पेंच ६३.५० टक्के ८६.३७ टक्के

  • नवेगाव खैरी ४७.३५ टक्के ७८.७१ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT