file photo 
नागपूर

कामठीत नागरिकांच्या घरांमध्ये शिरले कंबरभर पाणी; कोण आहे दोषी?

सकाळ वृत्तसेवा

कामठी (नागपूर) : तालुक्‍यात वादळी वारा व विजेच्या कडकडांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने कामठी नगरपालिका व तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या मॉन्सूनपूर्व तयारीची पोलखोल केली आहे. 

कामठी शहरासह तालुक्‍यात आज सकाळी सातच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. तुंबलेल्या नाल्या, गटारींचे पाणी नागरिकांच्या घरांत शिरले. प्रभाग 15 तील आनंदनगर, शिवनगर, विक्‍तूबाबानगर, सैलाबनगर, समतानगर या सखल भागांतील घरांत कंबरेपर्यंत पाणी शिरले. यात मोठे नुकसान झाले. ऐन पावसाळ्यात रस्ते व नाली बांधकामामुळे हा प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नगर परिषद अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे नुकसान झाल्याचा आरोप नगरसेविका संध्या रायबोले यांनी केला. 

कामठी शहर तसेच येरखेडा व रनाळा येथील अनेक नाले तुंबले होते. रस्त्यांवर पाणी साचले होते. नाल्यांतील गाळ काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला ठेवला होता. तो पावसाच्या पाण्याने पुन्हा नाल्यात गेल्याने नाले तुंबल्याच्या तक्रारी नागरिक करीत होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसह आजच्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विशेषता शेतकऱ्यांच्या मशागतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या होत्या. बराच वेळ विद्युत पुरवठा खंडित होता. तालुक्‍यातील काही भागांत पाऊस झाला. 

घरांमध्ये शिरले पाणी 
महादुला नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे श्रीवासनगर भागात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. श्रीवासनगरात सपाटीकरण व नालीचे काम सुरू आहे. हे काम पावसाळ्याआधी पूर्ण झाले असते तर नागरिकांच्या घरांत पाणी शिरले नसते. याला नगरपंचायत प्रशासन जबाबदार आहे. नागरिकांचे अन्नधान्य व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यात विजय मेश्राम, नरेश सोनवणे, किसन अंबाडारे, माणिकराम भौतिक, रवींद्र नेवारे, युवराज बावनथडे, श्रीराम पटले, वसंतराम चव्हाण, राजू नेवारे, देवराज वाघाडे, गुड्डू वाघाडे, बालचंद शेंदरे, शंकर नेवारे, अजित डोंगरे, लक्ष्मी वैद्य, चंद्रकला नायर, लता वाघमारे, सचिन डायरे, महेंद्र भलावी, रत्नाकर हिरुळकर, जवाहर पटले, सोमेश्वर कटरे, अख्तर शेख, जावेद सय्यद, द्वारका मेश्राम, नरेश मासुलकर, दिनेश भलावी, राजेश क्षीरसागर, प्रवीण घोडेस्वार यांचा समावेश आहे. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, संजय रामटेके व नागरिकांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : माता न् तू वैरिणी ! आईनेच एक महिन्याच्या चिमुकलीला तलावात बुडवले अन्...

Latest Marathi News Updates : उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी

Beed Crime: मद्यधुंद चालक-वाहकांनी दामटली बस; बीडजवळ प्रकार उघडकीस, प्रवाशांची घाबरगुंडी, गुन्हा नोंद

Paithan Pandharpur Road: पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम रखडले; अवमान याचिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नोटीस

ULFA(I) claim Indian Army drone strike: ! भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचा दहशतवादी संघटना ULFA(I)चा दावा!

SCROLL FOR NEXT