weather update monsoon in vidarbha Meteorological Department possibility of rain nagpur
weather update monsoon in vidarbha Meteorological Department possibility of rain nagpur  sakal
नागपूर

मॉन्सून आला पण पावसाची दांडी; विदर्भात थंड आगमन

नरेंद्र चोरे

नागपूर : ज्या क्षणाची बळीराजासह विदर्भातील सर्वसामान्य नागरिक आतुरतेने वाट पाहात होते, तो मॉन्सून गुरुवारी विदर्भात दाखल झाला. मात्र अपेक्षेप्रमाणे धुवाधार पाऊस न पडल्याने नागपूरकरांची घोर निराशा झाली. मात्र हवामान विभागाने शुक्रवारनंतर विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने या आठवड्यात वरुणराजा बरसण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण-पश्चिम मॉन्सूनने यंदा अंदमान व त्यानंतर केरळमध्ये निर्धारित वेळेआधीच धडक दिल्याने विदर्भातही मॉन्सूनचे लवकर आगमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मधल्या काळात अनुकूल वातावरण न मिळाल्याने मॉन्सूनची पुढील वाटचाल मंदावली. त्यामुळे विदर्भातही मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले. गेल्या चार-पाच वर्षांचा इतिहास लक्षात घेतल्यास यंदा दुसऱ्यांदा विदर्भात मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले आहे.

विदर्भात मॉन्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली. मात्र मॉन्सूनला जोर नसल्यामुळे अपेक्षेप्रमाणे बरसलाच नाही. शहरावर बराच वेळपर्यंत काळेकुट्ट ढग गोळा झाले होते. काटोल रोड परिसरासह काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. अन्य भागांत कुठे रिमझिम, तर कुठे हलका शिडकावा झाला. ग्रामीण भागांत दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. वर्धा जिल्ह्यातही चांगला पाऊस कोसळला. अर्धेअधिक मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे विदर्भातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांना सल्ला दरम्यान, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. किमान ७५ ते १०० मिमी पाऊस आणि जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विदर्भात गेल्या दहा वर्षांतील मॉन्सूनचे आगमन

वर्ष - तारीख

२०२२ - १६ जून

२०२१ - ९ जून

२०२० - १२ जून

२०१९ - २२ जून

२०१८ - ८ जून

२०१७ - १६ जून

२०१६ - १८ जून

२०१५ - १३ जून

२०१४ - १९ जून

२०१३ - ९ जून

२०१२ - १७ जून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT