Firing sakal
नागपूर

WhatsApp Status : चुकीची कमेंट केल्यामुळे वरातीत गोळीबार; चाकू हल्ला

मंगेश गोमासे

नागपूर : व्हॉट्सॲप स्टेटसवर (WhatsApp Status) खराब कमेंट केल्याने तरुणाने चक्क वरातीमध्ये दुचाकीवर येत हवेत गोळ्या झाडल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खाना खजाना हॉटेल समोर रोड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी सातपैकी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची रवानगी पाच दिवसाच्या पोलिस कोठडीत केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर खान (२२), अल्तमास अन्सारी ऊर्फ अयुब अन्सारी, अन्वर अन्सारी ऊर्फ असरार अंसारी (२२), मोहम्मद सोहेल अन्सारी ऊर्फ सईद अंसारी आरिफ अन्सारी आयुब अन्सारी, मोहम्मद कैफ अशी आरोपींची नावे आहेत. काल रात्री फिरोज खान ऊर्फ गफार खान (४५ रा. मेहबूबपुरा) यांच्या पुतण्याचे लग्न होते. वरात काढण्यात आली. वरात खजाना हॉटेल समोर रोड परिसरात येताच वरातीच्या मधोमध दुचाकीवर समीर आणि मित्र अल्तमस आला.

यावेळी समीरने बंदूक काढून हवेत दोन गोळ्या (firing) झाडल्या. अचानक झालेल्या प्रकाराने वरातीमधील नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी समीरने फिरोज खान यांच्या भाचा अशरफ खान अकरम खान (वय १६) याच्यावर चाकूने हल्ला करीत जखमी केले. मित्रासह पळून जात असताना नातेवाइकांनी त्याला पकडले. नातेवाइकांनी मारहाण करीत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत चाकू, बंदूक आणि फायर केलेले दोन काडतूस जप्त केले. यानंतर पोलिसांनी चार साथीदारांना अटक करीत गुन्हा दाखल केला.

असा घडला प्रकार

समीर खान यांच्याबाबत मलई ऊर्फ आबा कक्ष पठाण याने केलेला मेसेज रिजवान नावाच्या मुलाने स्टेटस (WhatsApp Status) ठेवले होते. त्यावर अशरफ खान अकरम खानने चुकीच्या पद्धतीने कमेंट केली. त्यामुळे समीर खान याने अशरफ खान अकरम खान याला फोन केला. स्टेटसवर चुकीची कमेंट (Wrong comment) का केली? अशी विचारणा केली. त्यावर अशरफ खान अकरम खानने ‘मी बादशाह आहे’ असे म्हटले. त्यामुळे समीर खानने त्याला कुठे आहेस अशी विचारणा केली. तेव्हा शाहबाजने मी लग्नाच्या वरातीत खाना खजाना हॉटेल जवळ असल्याचे सांगितले. त्यातूनच त्याने वरातीत जाऊन हवेत गोळीबार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT