who is the group leader of bjp congress and ncp in nagpur zp 
नागपूर

'त्या' १६ सदस्यांमध्ये तीनही पक्षांच्या गटनेत्यांचा समावेश, आता गटनेतेपदी कोणाची वर्णी?

नीलेश डोये

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा परिषदेमधील ओबीसी वर्गातील १६ सदस्यांचे पद रिक्त झाले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तीनही पक्षांच्या गटनेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कुणाची वर्णा लागते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकजण पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. 

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा १६ मार्चला आयोजित केली आहे. पक्षाकडून सदस्यांसाठी काढण्यात येणारे व्हीप गटनेत्यांच्या नावे काढण्यात येते. त्यामुळे सभेच्या आधीच गटनेत्याची नियुक्ती किंवा तात्पुरती नियुक्ती करावी लागणार असल्याची चर्चा आहे. या पदासाठी सर्वच पक्षांत अनेक जण उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ सदस्य म्हणून नाना कंभाले व शांता कुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. उपाध्यक्षपद मनोहर कुंभारे यांच्याकडे देण्यात आले असताना गटनेतेपदही त्यांच्याकडे होते. महत्त्वाचे पद न मिळाल्याने नाना कंभाले नाराज असल्याची चर्चा होती. उपाध्यक्षपदासाठी ते इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, ते मंत्री केदार गटाचे नसल्याचे सांगण्यात येते. शांता कुमरे याही ज्येष्ठ आहेत. असे असताना कोणत्याही प्रकारचे पद न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख व माजी मंत्री बंग यांचे पुत्र दिनेश बंग यांच्यापैकी एकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर कोल्हे हे देशमुख गटाचे आहेत. भाजपचे गटनेते अनिल निधान यांनाही न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला आहे. भाजपकडून कैलास बरबटे, सुभाष गुजरकर, व्यंकट कारेमोरे यांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT