खापरखेडाः चनकापूर येथे सील करण्यात आलेला परिसर.  
नागपूर

अख्खा जिल्हा कोरोनाग्रस्त, प्रचंड संख्येने वाढताहेत दररोजचे रुग्ण…

विजयकुमार राऊत

नागपूर जिल्हाः नागपूर जिल्हयात कोरोनाग्रस्तांचा आकडा प्रचंड गतीने वाढत आहे. सुरवातीला जिल्हा सुरक्षित होता. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर रुग्णांची संख्या आपोआप वाढत गेली. त्यामागे विविध कारणे असली तरी नागरिकांचा मुक्त संचार हेही एक कारण समजावे लागेल.एकट्या कामठी तालुक्यात कोरोनाने कहरच केला आहे.येथील एकूण आकडा सातशेच्या वर गेला आहे. गेल्या महिनाभरात येथे आतापर्यंत २६ मृत्यू झाले आहेत. भिवापूर, कुही, उमरेड यासारखे तालुके कालपरवापर्यंत निरंक असली तरी आता तिथेही रुग्ण आढळल्याने संपूर्ण तालुका आता कोरोनाग्रस्त झाल्याचे दिसत आहे.

कामठीत ४७ पॉझिटिव्ह, मृत्यूचा आकडा २६ वर
कामठीः तालुक्यात दर दिवसाला बधितांचा आकडा फुगत असताना कोरोनाच्या मृत्यूमध्ये दररोज वाढ होत आहे. १७ जुलै पासून सतत एकामागे एक २६ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी मात्र कायम आहे. तर तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आठशेच्या घरात गेली असून मागील एक आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्चांक गाठत आहे. आज पुन्हा तब्बल ४७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यात सर्वाधिक ग्रामीण भागातील ३४ रुग्ण आहेत. गुमथळा चौदा, महादुला बारा, येरखेडा तीन, आजनी दोन व रनाळा, भिलगाव व कवठा येथील प्रत्येकी एक तर छावणी परीषद क्षेत्रातील सहा व शहरातील विविध भागातील सात रुग्णांचा समावेश आहे.

अधिक वाचा  :कुऱ्हाड हातात घेऊन 'तिने' स्वत: तोडल्या झाडाच्या फांद्या; अवघ्या 20 मिनिटांत वाहतूक झाली सुरळीत

कळमेश्वर शहरासह तालुक्यात दहा पॉझिटिव्ह
कळमेश्वरः नगर परिषद कळमेश्वर-ब्राम्हणी शहर परिसरात आज बुधवारी ८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तालुक्यातील ग्रामीण भागात २ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. तालुक्यातील एकंदर रूग्णसंख्या १७४ झाली आहे. कळमेश्वर न.प.परिसरातील जुना गावठान भाग वार्ड क्र.१ येथील एक, महाजन ले आाउट येथील एक, हूडको कॉलनी वार्ड क्र.१४ मधील येथील एक, एमआयडीसी वार्ड क्र.१३ येथील एक, वार्ड क्र.२ येथील एक, देशमुख ले आउट वार्ड क्र.१० येथील एक, वार्ड क्र. ८ येथील एक, जेएसडब्ल्य कॉलनी येथील एक, असे मिळून तब्बल ८ रूग्ण बुधवारी आढळले. कळमेश्वर पं.स.अंतर्गत तालुक्यातील उबाळी येथील १ व खुमारी येथील १, असे एकूण दोन रूग्ण ग्रामीणमध्ये आढळले.. आज दिवसभरात मिळालेल्या विविध भागातील १० पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

पारशिवनी शहरात महिला व मुलगा संक्रमित
पारशिवनीः कोरोना संक्रमण ग्रामीण भागात वाढत असून घेण्यात येत असलेल्या चाचणीत अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर आज पारशिवनी एमजी कॉलेज येथे १०८ नागरिकांची तपासणी करण्यात आली . त्यात शहरातील एक २५ वषींय महिला व २० वषींय मुलगा हा कोरोना संक्रमित आढळून आले. त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सततच्या कोरोना चाचणीत कमी जास्त प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने शहरात भीतीचे वातावरण दिसून येत आहे. नागरिकही आता स्वेच्छेने तपासनी करण्यात समोर येत असल्याने पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन केले जात आहे. मौद्यात बुधवारी शहरात ३ पॉझिटिव्ह आढळले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३४ झाली आहे. त्यातील ११ रुग्ण बरे झाले आहेत.  
 

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT