dirtiness in nagpur  
नागपूर

स्मार्ट सिटी की दारूचा अड्डा? उड्डाणपुलाखाली दिवसाढवळ्या रंगतात दारूच्या पार्ट्या; सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य

नरेंद्र चोरे

नागपूर : शहरात जागोजागी सिमेंट रोड व उड्डाणपूल झालेत. मेट्रोही धावू लागली. मात्र नागपूरकरांचा बेजबाबदारपणा व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'स्मार्ट सिटी'च्या सौंदर्यावर काळे डाग पडत चालले आहे. वर्धा रोडवरील उड्डाणपूल याचे उत्तम उदाहरण आहे. या पुलाखाली भिकाऱ्यांच्या वावरामुळे सर्वत्र कचरा, घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

'स्मार्ट सिटी'च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत कोट्यवधी रुपये खर्चून चकचकीत सिमेंटचे रस्ते व उड्डाणपूल बनले. त्यामुळे नागपूरकरांची तर सोय झालीच, शिवाय शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. मात्र काही मूठभर लोकांच्या गैरवर्तणुकीमुळे प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. 

सर्वात वाईट अवस्था वर्धा रोडवरील उड्डाणपुलाची झाली आहे. पंचशील टॉकीजपासून ते राहाटे चौकापर्यंत उड्डाणपुलाखाली अनेक निराधार व भिक्षेकऱ्यांनी आपले दुकान थाटले आहे. ते दिवसभर भीक मागतात, रात्री तिथेच झोपतात. भिकेच्या पैशातून दोन घास पोटात टाकतात आणि उरलेल्या पैशात दारूच्या पार्ट्या करतात.

 रात्रीच्याच वेळी नव्हे, दिवसाही हे चित्र पाहायला मिळते. या परिसराचा फेरफटका मारला असता, जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच जमा झाल्याचे नजरेस पडते.

सौंदर्यीकरण करण्याची मागणी

भिक्षेकऱ्यांनी उड्डाणपुलाखाली केलेल्या घाण व कचऱ्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. याचा त्रास येथून ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनधारकांना होत आहे. एकेकाळी उड्डाणपुलाखाली वृक्षारोपण करण्यात आले होते. भिंती रंगविण्यात आल्याने हा परिसर सुंदर दिसत होता. मात्र भिक्षेकऱ्यांचा वावर व व्यवस्थित देखभाल होत नसल्यामुळे शहराच्या या मुख्य मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने उड्डाणपुलाखालील भिक्षेकऱ्यांना हटवून, या परिसराचे सौंदर्यीकरण करावे, अशी नागपूरकरांची अपेक्षा व मागणी आहे. 
 
संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT