wine. 
नागपूर

तळीरामांना अजून पाहावी लागणार वाट, उत्साहावर पडले विरजण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून 'वाईन शॉप'पुढे रांगेत उभे राहून दारू खरेदीची स्वप्ने रंगवित असलेल्या तळीरामांना तूर्तास तरी सोशल मीडियावरील जोक्‍स, मिम्सचाच आधार घ्यावा लागणार आहे. दारूवरून सोशल मीडियावर विविध जोक्‍सचा पाऊस पडत आहे. तळीरामांचा उत्साह वाढविणारे, त्यांची उपयुक्तता दर्शविणारे जोक्‍स वाचून दारूच्या प्रतीक्षेतील नागरिक चर्चेदरम्यान प्रशासनावर चिडल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मेला संपुष्टात आला. परंतु त्यापूर्वीच अनेकांनी राज्य सरकार दारूच्या दुकानांना परवानगी देणार असल्याचे अंदाज बांधले होते. तळीरामांनी 4 मेपासून दारू खरेदीचे मनसुबे बांधले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये दुकाने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. रेड झोनमध्येही हॉटस्पॉट ठरलेला परिसर वगळता इतर क्षेत्रातील रस्त्याच्या एका बाजूची पाच एकल दुकाने सुरू करण्याची परवानगी दिल्याने शहरातील तळीरामांत उत्साह संचारला होता. काही दारू विक्रेत्यांनी दुकानांपुढे ग्राहकांनी ठरावीक अंतरावर उभे राहावे, यासाठी गोल निशाणही केले. परंतु काल, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊनप्रमाणेच 17 मेपर्यंत अंमलबजावणी केली जाणार असल्याची कठोर भूमिका घेतली अन्‌ तळीरामांच्या उत्साहावर विरजण पडले.
त्यामुळे आता नागपुरातील दारूची बंद असलेली दुकाने सोशल मीडियावर गाजत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या शहरात दारूची दुकाने उघडल्यानंतर गर्दी झाली, तशीच गर्दी आता सोशल मीडियावर दारू संबंधातील जोक्‍सची दिसून येत आहे. दुकाने सुरू होण्यापूर्वीच तळीरामांचा उत्साह वाढविणारे जोक्‍स, मिम्स सोशल मीडियावर आले. त्यातून चांगलेच मनोरंजन झाले. 'ज्याला बेवडे समजत होते, ते तर अर्थव्यवस्थेचा कणा निघाले', 'उठ बेवड्या जागा हो, अर्थव्यवस्थेचा धागा हो', या व्हॉट्‌सअपवरील जोक्‍सने तळीरामांसोबत इतरांचेही मनोरंजन झाले. आता तळीरामांकडून प्रशासनाविरुद्ध व्हॉट्‌सअपवरील विविध गृपवर संताप व्यक्त होत आहे. दोन मित्रांच्या चर्चेतूनही पालिका प्रशासनाला लक्ष्य केले जात आहे.

सविस्तर वाचा - तुम्ही रोगयुक्‍त फळे तर खात नाही ना?
महापौरांच्या 'फेसबुक लाईव्ह'वरही दारूचाच विषय
महापौर संदीप जोशी यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कमेंटमध्ये आठशेवर प्रश्‍न आले. यात दारू दुकाने सुरू करण्यासंबंधी सर्वाधिक प्रश्‍न होते. राज्यातील इतर शहरात रेड झोनमध्येही दारू दुकाने सुरू असताना शहरात का नाही? असे प्रश्‍न अनेकांनी विचारले. विकी सोनकुसळे, आकाश बैसवारे, रितेश बारस्कर, रोहित चांदेकर, उन्मेश गुरव यांच्यासह अनेकांनी दारू दुकाने सुरू करा, अशी मागणी केली तर वैभव गंधर्व, गजानन सेलोरे यांनी दारू दुकान सुरू करण्यास विरोध दर्शविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : यूपीची 'ही' ग्रामपंचायत कचऱ्यातून छापतेय नोटा; कल्पना झाली हिट; पंतप्रधान मोदींशी आहे कनेक्शन!

Tarot Prediction : आज 7 डिसेंबरला बनतोय लक्ष्मी योग; 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव

Solapur Weather Update: तापमानात मोठी घसरण; पुन्हा सोलापूरात जाणवणार कडाक्याची थंडी

आजचे राशिभविष्य - 07 डिसेंबर 2025

Sunday Breakfast Recipe: रविवारी नाश्त्यात बनवा 'मेथी पनीर पराठा', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT