हिवाळ्यात भाजीपाला महागच; टोमॅटो १२० रुपये sakal media
नागपूर

Nagpur : हिवाळ्यात भाजीपाला महागच; टोमॅटो १२० रुपये

यंदा अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सर्व गणिते बिघडली आहेत

राजेश रामपूरकर :सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिवाळ्यात भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे उत्पादनही चांगले होते. परराज्यातून भाजीपाल्याची आवक वाढत असते. बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होऊन दर कमी होतात. मात्र, यंदा अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सर्व गणिते बिघडली आहेत. नोव्हेंबर महिना सुरू होऊनही भाजीची आवक अद्यापही मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे भाजीचे भाव चढेच आहेत. नोव्हेबर महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. भाजीची आवक वाढण्यासाठी डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अवेळी आलेल्या पावसामुळे यंदा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर येणारा भाजीपाला पाण्यात वाहून गेला. परिणामी, भाजीपाल्याची कमतरता जाणवत आहे. ग्राहकांना वाढीव दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. टोमॅटो आणि कोथिंबिरचे भाव सर्वाधिक वाढलेले आहे.

टोमॅटो किरकोळ बाजारात १०० रुपये तर कोथिंबीर १५० रुपये किलोवर पोचले आहे. हिरवे वाटाणे सध्या दिल्लीवरून येत असून आवक कमी असल्याने त्याचे भाव प्रति किलो २०० ते २५० रुपये किलोवर पोचले आहे. आवक कमी असल्याने सर्वच भाज्या किरकोळ बाजारात ६० ते १०० रुपये किलो झालेल्या आहेत असे अडतिया भाजी संघटनेचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

ठोक बाजारातील भाजीपाला दर (रुपये प्रति किलो)

कोथिंबीर - ८० रुपये , वांगे ३० रुपये ,गवार शेंग - ३० रुपये , मेथी - ४० रुपये, हिरवी मिरची - ३० रुपये ,चवळी - ४० रुपये ,फुलकोबी - ४० रुपये, पानकोबी १५ रुपये, टोमॅटो - ८० रुपये, भेंडी - ३० रुपये , शिमला मिरची - ३० रुपये, तोंडले - ३० रुपये, कारले - ३० रुपये ,कोहळा - ३० रुपये, दुधी भोपळा - १५ रुपये, पालक - १० रुपये, मुळा - २० रुपये, ढेमस - ३० रुपये, गाजर -३० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT