drown sakal
नागपूर

नाव नदीत उलटल्याने महिलेचा मृत्यू

कुही तालुक्यातील घटना, चौघींना वाचविण्यात यश

सकाळ वृत्तसेवा

साळवा कुही : कुजबा गावावरून पाच मजूर नावेने शेजारच्या पोहरा या गावी शेतात कामावर जात असताना अचानक आम नदीत नाव उलटून सर्व बुडाले. त्यात एका महिला मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२०) घडली. मृत महिलेचे नाव गीता रामदास निंबर्ते (वय२६, कुजबा) असे आहे.

कुजबा येथील मंगल देवराव भोयर, गीता रामदास निंबर्ते, मनिषा राजू ठवकर, मोनू सुरेश साळवे, परमानंद रामचंद्र तिजारे, शीला तिजारे, लक्ष्मी गिरी हे मजुर शेतमालक परमानंद तिजारे यांच्याच नावेने कापूस वेचायच्या कामाला जात होते. कुजबा व पोहरा या दोन्ही गावाच्या मधून आम नदी जाते. नदीला गोसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वॉटर’ असल्यामुळे बाराही महिने पलीकडच्या पोहरा येथे नावेने जावे लागते. आम नदीच्या पात्रात अचानक डोंगा फुटल्याने नावेमध्ये पाणी भरत असताना नावेत बसलेल्या महिला घाबरल्याने डोंगा उलटला. नावेसह मजूरही पाण्यात बुडाले. पाच मजुरांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. गीता रामदास निंबर्ते (वय२६, कुजबा) या मजूर महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वेलतूर पोलिसांना दिली. ठाणेदार आनंद कविराज, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश डोर्लीकर, शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे, जि.प.सदस्य अरुण हटवार, माजी जि.प. सदस्य बालू ठवकर, माजी सभापती नंदा तिजारे आदी घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्याला सुरुवात केली. स्थानिक पोहणाऱ्यांच्या सहकार्याने महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

मृत गीता रामदास निंबर्ते या महिलेला एक दीड वर्षाची मुलगी आहे. मृत गीताचे पती मतीमंद आहेत. गीताचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रुग्णालयात पाठविण्यात आला. मनू सुरेश साळवे, मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी लोमेश्वर गिरी, मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी लक्ष्मी गिरी व परमानंद तिजारे यांच्यावर प्राथमिक उपचार करून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले.

घटनेची तिसऱ्यांदा पुनरावृत्ती

गोसेखुर्द प्रकल्पाचा (gosekhurd )जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने कुजबा येथील आम नदीमध्ये अथांग पाणी जमा झालेले आहे. दररोज मजूर जिवाची पर्वा न करता नदीपलीकडे मजुरीसाठी नावेने जातात. घटनेच्या वेळी परमानंद तिजारे हे स्वतः नाव हाकत होते. घटनेची माहिती मिळताच आमदार राजू पारवे घटनास्थळी पोहचले. कुजबा येथे यापूर्वी तीनदा अशा दुर्दैवी घटना घडलेल्या (death in water)असून कुजबा गाव शंभर टक्के पुनर्वसन करून देणारच, असे आश्‍वासन आमदार पारवे यांनी दिले. उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार उपेश अंबादे यांनी मृताच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमाने आर्थिक मदत(economical help) मिळवून देऊ, असे आश्‍वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : भारतीय देशांतर्गत हवाई क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असून सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर - मोहन नायडू

SCROLL FOR NEXT