woman mortal found in water canel in Nagpur district  
नागपूर

पाण्याच्या कॅनलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; अवस्था बघून उपस्थितांच्या पायाखालची सरकली जमीन

अतुल दंढारे

मेंढला (जि. नागपूर) : इथून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या रानवाडी शिवारातील पाण्याच्या कॅनल मध्ये सोमवारी दुपारी ३.३० वाजता च्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेचे नाव शीला चंद्र भान बागडे वय वर्ष ५५ रा.  रानवाडी ता. नरखेड  येथील रहिवासी होती.  

मृत महिला ही विवाहित असून ती  तिच्या आईसोबत रान वाडी येथे राहत होती. घटनेच्या दिवशी मृत महिलेची आई काही कार्यक्रमाकरिता बाहेर गावी गेली होती. मृत महिला ही मानसिक आजारी असल्यामुळे तिला पाणी पाहल्यावर फिट येतो होती. त्यामुळे मृत महिला कॅनल वर गेल्यावर पाणी पाहून फिट आली असावी आणि ती पाण्यात पडली असावी त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीत पोलिसांनी दिली.

पण या उलट मात्र गावातील परिसरात वेगळीच कुजबुज चर्चा सूरु आहे की..महिला जर पाण्याला भीत होती तर ती पाण्याजळव गेलीच कश्याला..आणि ते भी कपडे काढून..आम्ही आज पर्यंत तिला निवस्त्र अवस्थेत कधी पाहले नाही..प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर होत नाही ना?

रानवाडी शिवारातील लोकांना या महिलेचा मृत देह पाण्याच्या कॅनल मध्ये आढळून आला असून लगेच त्यांनी या बाबत पोलिसांना माहिती दिली असता लगेच जलालखेडा पोलिसांनी लगेच घटना स्थळ गाठून महिलेचा मृतदेह कॅनल मधून बाहेर काढला व उत्तरीय तपासणी साठी जलालखेडा येथील शववीच्छेदन गृहात पाठवण्यात आला असून मृत महिलेला दोन मुल व मुली आहे. या प्रकरणाचा  पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र सोणवाने यांच्या मार्गदर्शन खाली प्रज्योग तायडे करत आहेत. 

गावातील नागरिकांमद्धे वेगळीच चर्चा

मृत महिला शीला बागडे हिला मानसिक आजार असल्याचे आम्हाला कधी आढळून आले नाही. महिलेचा मृत देहावर कपडे नव्हते त्यामुळे या महिलेसोबत काही वाईट कृत्य करून तिला मारून टाकले असावे असा संशय गावकऱ्यांना आहे.तिला आम्ही याआधी कधीच निवस्त्र पाहले नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT