The woman was burnt alive in Sadar Chowk Nagpur crime news 
नागपूर

थरार! सदरमध्ये भरचौकात महिलेला जिवंत जाळले; भांडण सोडविणे बेतले जिवावर

योगेश बरवड

नागपूर : युवक आणि युवतीत सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची घटना सदर येथील भरचौकात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी सदरच्या अंजुमन पॉलिटेक्निक कॉलेज जवळील हल्दिरामसमोर भरचौकात झालेल्या या घटनेतील महिलेचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला. शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेंद्रनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शबाना या अजनीतील टाटा मोटर्समध्ये कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी काम आटोपून त्या आपल्या ज्युपिटर मोपेडने परतीच्या प्रवासाला निघाल्या. हल्दीराम इमारतीपुढे तरुण-तरुणीचा आपसात वाद सुरू होता. युवक कमालीचा संतापला असल्याने गर्दीची वेळ असूनही कुणीही मध्यस्थीचा प्रयत्न केला नाही.

शबाना यांनी तरुणीला मदतीची गरज असल्याचे हेरले. सद्‍भावनेतूनच त्या थांबल्या. वाहन ठेवून दोघांमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न केला. डोक्यात सैतान संचारलेल्या युवकाला ही मध्यस्थी रुचली नाही. त्याने पेट्रोल भरलेली बाटली सोबतच आणली होती.

शबाना यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करताच तरुण चवताळला. सोबत आणलेली बाटली त्याने शबाना यांच्या अंगावर ओतली आणि आगपेटी लावली. क्षणार्धात महिलेच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे तेथे उपस्थित नागरिक अवाक झाले. महिला जळत असताना आरोपी युवक तरुणीला दुचाकीवर घेऊन पळून गेला. त्यानंतर नागरिकांनी धाव घेत आग विझवली.

शबाना यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १२ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सदर पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Rain Update: पुणे-मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची हजेरी, या' जिल्ह्यांत अलर्ट जारी; मान्सूनचा परतीचा प्रवास तीन दिवस आधीच सुरु

Masala Paneer Rolls: मुलांच्या टिफिनसाठी १० मिनिटांत बनवा मसाला पनीर रोल्स, सोपी आहे रेसिपी

माेठी बातमी! ‘सारथी शिष्यवृत्ती बंद’मुळे शिक्षण धोक्यात; अल्प उत्पन्न गटातील ७० हजार मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर परिणाम

Satara Fraud: 'कर्जाच्‍या आमिषाने २४ लाखांची फसवणूक'; सहा महिन्‍यांनंतर संशयित गजाआड, १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

बळिराजाला पडलाय ‘जगावे की मरावे’ असा प्रश्‍न! सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दीड महिन्यात १४२ कोटींचे नुकसान; भरपाईसाठी असणार ‘हा’ निकष

SCROLL FOR NEXT