corona mask 
नागपूर

महिलांनो कोरोनाला घाबरताय! जाणून घ्या बचावासाठी या काही टीप्स

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सकाळी उठल्यावर गरम पाणीच पिणे पुरेसे आहे का?, मुलांना दुधात हळद टाकून देऊ की, आणखी काही प्रोटीन देऊ, बाहेरून आणलेले किराणा सामान, भाजी थोडा वेळ बाहेरच ठेऊ का? मुलांचे चॉकलेटही पाण्याने धुवुन घेऊ का? असे एक ना अनेक प्रश्‍न सध्या महिलांना पडत आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न नागपूरातील काही महिलांनी केला आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्याकरीता काही महिलांनी ऑनलाइन पद्धतीने एकत्रित येऊन, जगजागृतीपर संदेश देणारा व्हिडीओ तयार केला आहे.
जगभरात कोरोना व्हायरस जीवघेणा ठरतो आहे. या आजारावर आजतागायत कोणताही अधिकृत उपचार शोधला गेला नाहिये. तसंच या व्हायरसवर ठोस उपाय म्हणून लसीकरणही उपलब्ध नाही, अशी माहिती भारत सरकारच्या आरोग्य विभागाने अलीकडेच नागरिकांना दिली. त्यामुळे या "कोरोना' पासून दूर राहण्यासाठी काळजी घेणे हाच एकमात्र उपाय आहे.
कोरोनापासून बचावासाठी काही महिलांनी एकत्रित येऊन व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये काही मैत्रिणींनी अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात विशेषत:स्त्रियांनी काय काय खबरदारी घ्यायची हे सांगितले आहे. हा व्हिडीओ घरी राहूनच तयार केला आहे. सध्या विविध चॅलेंज देणे खूप प्रचलित झाले आहे. त्यामुळे बायकांना फक्त नटण्या मुरडण्यापलीकडे काही दिसतच नाही अशी दुषणे देऊन, सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे. या ट्रोलींगला उत्तर देतांना विदर्भातील महिलांनी अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काय खबरदारी घ्यावी याविषयी या व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. व्हिडीओमध्ये महिलांनी रोज योगा, प्राणायाम करणे, स्वतःचे व लहान मुलांचे निर्जंतुकीकरण, मास्क वापरणे, दोन मीटरचे अंतर राखणे, भाज्या मिठाच्या पाण्याने धुणे, साबणाने हात स्वच्छ धुणे, घरातील दार हॅण्डल लॉक, गाडी व कार निर्जंतुक करणे असे संदेश नव्या पद्धतीने दिले आहेत. या व्हिडीओमधील संदेशाचे निता चिकारे यांनी लेखन केले असून, यात स्मिता कुलकर्णी (पुणे), श्वेता बंगाले (मुंबई), निता चिकारे (नागपूर), श्वेता आंबेकर (नागपूर), आदिती पाठक (नागपूर), राजश्री बनसोड (नागपूर), प्रिया पळसोकर (यवतमाळ), पल्लवी चिकारे(नागपूर) यांचा समावेश आहे.

माहितीपटातून जनजागृती
देशावर जीवन मरणाचे संकट आलेले असतांना बायका केवळ नटण्या मुरडण्यात वेळ घालवित त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. असा चुकीचा मेसेज सर्वत्र पसरविला जात होता. परंतु, कुटुंबाला कोरोना विषाणुपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांत महत्वाची भूमिका घरातील महिलेची आहे आणि ती योग्य प्रकारे पार पाडू शकते. स्रियांनी कशा पद्धतीने आपल्या कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवावे यासाठी माहितीपट तयार करून आम्ही जनजागृती करीत आहोत.
नीता चिकारे, नागपूर.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: रोज ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आजपासून मोठा बदल! पार्किंगसाठीही कठोर अट

Ajit Pawar : अजितदादा परत या! बारामती गहिवरली; महाराष्ट्र स्तब्ध, लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी निरोप

Latest Marathi News Live Update : कॅनॉट प्लेसमध्ये हाणामारीनंतर पोलिसांची कठोर कारवाई, टवाळखोरांची धिंड

Kolhapur Crime News : मोबाईलवर बोलताना अचानक मागून हल्ला, तरुणाचा पाठलाग करीत खून; गावची यात्रा सुरू असताना रक्तरंजीत घटना

Nagpur Bench : 'परस्पर सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार ठरवता येणार नाही'; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT