X-ray technicians' health at risk
X-ray technicians' health at risk 
नागपूर

ते वॉर्डातून येतात ‘साहेबऽऽ कधी निघेल जी एक्स-रे’ अस विचारत लहान तोंड करून परत जातात

केवल जीवनतारे

नागपूर : चाळीस वर्षांचा तरुण कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचा अहवाल प्राप्त झाला. दरम्यान, मेडिकलमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर डॉक्टरांनी एक्स-रे काढण्यासाठी केसपेपरवर लिहून दिले. एक्स-रे विभागात तीन तासांच्या प्रतीक्षेनंतरही एक्स-रे निघाला नाही. एक रुग्ण दोन दिवसांपासून एक्स-रे काढण्यासाठी वॉर्डातून येत आहे. परंतु, त्याचा एक्स-रे निघत नसल्याची शोकांतिका नातेवाईकाने व्यक्त केली.

राज्यभरात ५० टक्क्यांपेक्षा जास्त एक्स-रे तंत्रज्ञांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे ‍एक्स-रे, सीटी स्कॅन काढण्यासाठी कोरोनाबाधितांना तास दोन तासांची प्रतीक्षा करावी लागते. अशाही स्थितीत अतिरिक्त बोझा सहन करीत एक्स-रे तंत्रज्ञ आपला जीव धोक्‍यात घालून सेवा देत आहेत. नागपुरातील मेडिकलचा विचार करता नुकतेच १२ पोर्टेबल एक्स-रे यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

१२ विविध ठिकाणी हे यंत्र लावले आहेत. या बारा ठिकाणी २४ तास तीन पाळ्यांमध्ये एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु, मेडिकलमध्ये केवळ दोन शिफ्टमध्ये काम चालेल इतकेच मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यातही बाहेरून मिळालेले काही तंत्रज्ञ असल्याने काम सुरू आहे. मेयो रुग्णालयातही हीच स्थिती आहे. अवघ्या दहा ते बारा तंत्रज्ञांच्या भरवशावर कोरोनाच्या रुग्णांचे एक्स-रे काढण्याचे आव्हान पेलवले जात आहेत.

मेडिकलमध्ये ५०० पेक्षा अधिक एक्स-रे

मेडिकलमध्ये एक्स-रे विभागात दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांचे एक्‍स-रे काढण्यात येतात. मात्र, तंत्रज्ञांची संख्या अवघी २० च्या घरात आहे. या विभागात ३५ तंत्रज्ञांची गरज आहे. या विभागातील तंत्रज्ञांच्या समस्या सरकारकडे पाठविण्यात आल्या; परंतु साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.

पदोन्नतीचे धोरण राबवल्यास प्रश्न सुटेल

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे ७० पेक्षा अधिक एक्स-रे विभागात सहायक पदावर कार्यरत आहेत. मागील दोन दशकांपासून हे या विभागात कार्यरत आहेत. त्यांना एक्स-रे तंत्रज्ञ पदावर पदोन्नती दिल्यास राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एक्स-रे विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न सत्तर टक्के सुटेल. परंतु, पदोन्नतीच्या धोरणाकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे.

तंत्रज्ञांची रिक्त पदे भरली नाही

कोरोना संशयित असो की कोरोनाबाधित एक्स-रे आवश्यक आहे. यामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक्‍स-रे विभागात तंत्रज्ञांवर प्रचंड भार आला आहे. सरकारने पोर्टेबल एक्स-रे यंत्र उपलब्ध करून दिले. मात्र, तंत्रज्ञांची रिक्त पदे भरली नाही. यामुळे उर्वरित तंत्रज्ञांवर कोरोनाबाधितांचे एक्स-रे काढण्याचा अतिरिक्त भार आला आहे. यामुळे तंत्रज्ञांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लवकर उपचार मिळाले तर जीव वाचेल
कोरोनाच्या या संकटकाळात राज्यातील मेडिकल कॉलेजमध्ये सर्व एक्स-रे तंत्रज्ञ प्रामाणिकपणे काम करीत आहेत. या विभागातील एक्‍स-रे तंत्रज्ञांची पदे भरण्यात यावी. लवकर उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचेल. सरकारने याकडे लक्ष द्यावे.
- प्रकाश गढे,
सचिव, क्ष-किरण तंत्रज्ञ संघटना, महाराष्ट्र राज्य

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी

युरोपचे अवघडलेपण

SCROLL FOR NEXT