Nandini draws realistic pictures 
विदर्भ

‘ती’ आठवीतच रेखाटते वास्तववादी चित्रं

विवेक मेतकर

अकोला : इच्छा आणि कल्पनाशक्ती असेल तर सर्व साध्य करता येते. याचेच उदाहरण म्हणजे केवळ इयत्ता आठवीत असलेली नंदीनी सदानंद ढोरे. ही वाडेगावला राहत असून तीचे पालक तिला नेहमी प्रोत्साहित तर करतातच मात्र, शाळेलाही तिच्या चित्रकलेचं अप्रुप वाटतं. 

सातवीपूर्वी तीला आपण कधी चांगलं चित्र काढू असं वाटतच नव्हतं. मात्र, सातवीतच तीला वेगवेगळे विषय सुचायला लागले, आणि ती तेवढ्याच सुबकतेने कागदावर रेखाटायला लागली. हळूहळू आवड वाढू लागली. दरम्यान ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेत तिने सहभाग घेतला आणि घवघवीत यश मिळविलं. आत्मविश्वास द्विगुणीत झाला. आता ती ऑईल पेस्टर, ऑईल पेंटींग, कॅनव्हॉस पेंटींग अशी एकाहून एक सुरेख चित्र लिलया काढते. कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता नंदीनीने हे साध्य करून दाखविलं आहे.  

सकाळ चित्रकला स्पर्धेपासून मिळाली प्रेरणा
गतवर्षी आयोजित ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ नंदीनीच्या शाळेतच होती. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तिनेही सहभाग नोंदविला. मात्र, तिचं सुरेख चित्र प्रत्येकाला आवडालयला लागलं. दरम्यान, या स्पर्धेतून ती बक्षीसाची मानकरी ठरली असल्याने तिचा आनंद आणि आत्मविश्वास द्विगुणीत झाला असल्याचे नंदीनी सांगते.  

वडीलांने केले प्रोत्साहीत
नंदीनीचे वडील स्वतः शिक्षक आहेत. नंदीनीमध्ये वाढत जाणारी चित्रकलेची आवड वडीलांनी हेरली आणि वेळोवेळी तिला प्रोत्साहित केले. हवं ते साहित्य, हवा तो रंग पुरविण्यासाठी आई-वडीलांनी खऱ्या अर्थाने नंदीनीच्या चित्रकलेचेच लाड पुरविले.  

महत्त्वाची बातमी -  निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणे तलाठ्याला भोवले

शाळा जपतेय वेगळेपण
शिक्षण प्रसारक मंडळामार्फत चालविल्या जाणारी श्री जागेश्वर शाळा वाडेगावतील सर्वात मोठी शाळा आहेत. शेकडो विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करीत आहेत. असे असले तरी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षकांसह संचालकांचे लक्ष असल्याने नंदीनीसारख्या विद्यर्थ्यांमधील सुप्त गुणांना जोपासण्याचे काम तर ही संस्था करतेच. यासोबतच विविध स्पर्धांची माहिती, मार्गदर्शन आणि सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम उत्सुकतेने केल्या जात असल्याचे संस्थेचे संचालक गोपाल मानकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT