Akola
Akola 
विदर्भ

वऱ्हाडातील निसर्ग पर्यटनस्थळे लखलखणार 

सागर कुटे

अकोलाः ‘इको टुरिझम’ योजनेअंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, अकोट वन्यजीव व बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथील निसर्ग पर्यटनस्थळाचा विकास केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 2018-19 करीता 2 काेटी 65 लाख 8 हजार 85 रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निधीमुळे दोन्ही जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनस्थळ लखलखणार आहेत. 

वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी राज्यात इको टुरिझम योजना राबवण्यात येत आहे. इको टुरिझम योजनेंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी शासनाने यापूर्वी या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. राज्याचे मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. समितीने वनक्षेत्रातील पर्यटनस्थळी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची शिफारस केली होती. त्याबाबतचा शासन आदेश महसूल आणि वन विभागाने (ता.13) काढला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, अकोट वन्यजीव व बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथील निसर्ग पर्यटनस्थळाच्या विकासाकरीता 2018-19 साठी 2 काेटी 65 लाख 8 हजार 85 रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.

या निधीतून बंधारे, लेबर शेड, टावरलेस आॅफीस, विश्राम गृह, एनआयसी बिल्डींग, लेबर क्वाटर, इको फ्रेंडली पाणवठा, संकुलाचे सुशोभिकरण, रपटा तयार करणे, चेक पोस्ट, नाला खोलीकरण करणे, रस्ता दुरुस्ती करणे, माती नाला बांधकाम, रस्ता काॅंक्रीटीकरण करणे आदी कामे करण्यात येणार आहे. राज्यात धार्मिक पर्यटनस्थळी सुविधा निर्माण करण्यासाठी शासन नेहमीच पुढाकार घेत असते. मात्र, वनक्षेत्रातील पर्यटनस्थळे आजपर्यंत कायम उपेक्षित राहिलेली आहेत. इको टुरिझमच्या या योजनेस निधी मिळाल्याने त्याला आता गती मिळणार आहे. या निधीमुळे विविध विकास होणार असून, पर्यटकांना अधिक सोयी सुविधा मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निसर्ग पर्यटन धोरणाशी अनुकुल राहतील, अशीच कामे करण्याची सूचना शासनाने केली आहे. तसेच यामध्ये कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना शासनाने केली आहे. 

वितरीत करण्यात येणारा निधी 
अभयारण्य निधी 
काटेपूर्णा अभयारण्य 44 लाख 
ज्ञानगंगा अभयारण्य 58 लाख 
अकोट वन्यजीव विभाग 163 लाख 
एकूण 265885

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT