naxal arrested in gondia 
विदर्भ

गोंदियात जहाल नक्षलवाद्याला अटक, १० वर्षांपासून होता फरार

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : गेल्या  १० वर्षांपासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे. रमेश उर्फ हिडमा मडावी, असे त्याचे नाव असून गोंदिया पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

रमेश मडावी हा जहाल नक्षलवादी असून, त्याच्यावर जिल्ह्यातील चिचगड, देवरी, डुग्गीपार येथे दाखल असलेल्या विविध गुन्हे दाखल होते. मात्र, तो १० वर्षांपासून फरार होता, अशी गुप्त माहिती अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. दरम्यान, रमेश मडावी हा छत्तीसगड राज्यातील नक्षल अतिसंवेदनशील सुकमा जिल्ह्यात वावरत असल्याचे समजताच अपर पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व सी-60 पथक देवरीचे पथक तयार केले. सुकमा येथे त्यांना पाठविण्यात आले. तिथे मंगळवारी (ता.10) त्याला अटक करण्यात आली. 

रमेश मडावी हा 1998-99 मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर त्याने देवरी दलममध्ये ए.सी.एम. तसेच एल. ओ. एस. कमांडर म्हणून काम केले आहे. देवरी दलममध्ये असताना पोलिस ठाणे चिचगड अंतर्गत मगरडोह हद्दीत पोलिस पथकावर जीवघेणा हल्ला केला होता. खून, हल्ले, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस असे १० गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2, डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT