Naxalites stopped bus from gadchiroli to Laheri  
विदर्भ

मोठी बातमी! गडचिरोलीहून लाहेरीला जाणाऱ्या बसला नक्षल्यांनी अडवले; भारत बंद ठेवण्याचे आवाहन करणारे बांधले बॅनर 

मिलिंद उमरे

भामरागड (जि. गडचिरोली) : गडचिरोली येथून लाहेरी जाणाऱ्या बसला भामरागड तालुकास्थळापासून जवळपास 12 किमी अंतरावर लाहेरी मार्गावरील हिंदेवाडा परिसरात झाडे पाडून नक्षलवाद्यांनी अडवले. त्यानंतर बसमधील वाहनचालक, वाहकासह प्रवाशांना खाली उतरवून परत जाण्यास सांगितले. तसेच या परिसरात 26 नोव्हेंबरला भारत बंद ठेवण्याचे आवाहन करणारे बॅनर बांधून पत्रकेही टाकली.

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली येथून लाहेरी जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस बुधवारी (ता. 25) लाहेरी येथे मुक्‍कामी जाणार होती. दरम्यान नक्षल्यांनी भामरागड-लाहेरी मार्गावर हिंदेवाडाजवळ झाडे पाडून रस्ता अडवला. चालकाने बस भामरागडकडे आणत असताना पुन्हा एक झाड पाडून नक्षल्यांनी मार्ग अडवला. 

चालक, वाहकासह सर्व प्रवाशांना पायी भामरागडला पाठविले. हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच घटनास्थळी नक्षली बॅनर तसेच पत्रके आढळले आहेत. येथे बांधलेल्या बॅनरमध्ये 26 नोव्हेंबरला भारत बंद पुकारण्यात आला असून सर्वांनी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नक्षल्यांकडून मोठा घातपात करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT